मुंबई महानगर भारताची आर्थिक राजधानी दरवर्षी पावसाल्यात सर्वत्र पाणी साचत असल्याने तुम्बत असते. अशीच मुंबई या वर्षीही तुम्बली. 18 -19 जून दोन दिवस सतत मुसळधार पाउस पडत होता. मुंबईमधे सगळीकड़े पाणीच पाणी होते. या साचलेल्या पाण्यामुले वाहतुक खोलंबली होती. अनेक ठिकाणी वाहतुक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. रेलवे ट्र्याकवर पाणी साचल्याने रेलवे सेवा संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात आली होती. रस्ते आणि रेलवे वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुंबईकर नागरिक अर्ध्यावर अडकले. परत घरी जायला काहीच साधन नसल्याने अनेक लोकांचे वांदे झाले होते. मुंबईकर नागरिक दिवसभर महानगर पालिका आणि रेलवे प्रशासनाला शिव्या घालत होते. नालेसफाई योग्य रित्या होत नसल्याची, नालेसफाई मधे भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा होत होती. मुंबईकर नागरिकांना नालेसफाईची जी खरी परीस्थिती माहित आहे तशी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारयानाही ही परिस्थिती माहित आहे. परंतू या नालेसफईमधून मिळणाऱ्या टक्केवारीमुले हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले जात आहे. नालेसफाई मधील टक्केवारी थेट सत्ताधारयापर्यंत पोहचत असल्याने नाले सफाई कशी होत आहे हे पाहण्यासाठी दौरे काढले जातात. फोटोसेशन करून मीडिया मधून आम्ही किती चांगले काम करत आहोत याची प्रसिद्धीही केली जाते.
अशीच प्रसिद्धी या वर्षीही करण्यात आली. मुंबई महानगर पालिकेत 22 वर्षे सत्ता असलेल्या शिवसेनेच्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाई चांगली झाल्याचे प्रमाणपत्र दिले होते. तर मुंबईच्या वेळोवेळी वादग्रस्त विधाने करणारया महापौर स्नेहल आंबेकर यांनी नालेसफाई चांगली झाल्याने या वर्षी मुंबईकराना पावसाचा चांगला अनुभव घेता येईल असा दावा केला होता. शिवसेनेच्या नालेसफाई दौरयानंतर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी दौरा करून नालेसफाई मधील गाळ काढला जातो त्याच्या वजनावर प्रश्न उपस्थित केला होता. किती गाळ काढला याच्या वजन काट्यावर वजन केलेल्या पावत्या कंत्राटदाराकड़े नसल्याचे निदर्शनास आल्यावर स्थायी समितीमधे याबाबत आवाज उचलन्याचे आदेश गटनेते मनोज कोटक व इतर नगरसेवाकाना दिले होते. भाजपाने उपस्थित केलेल्या मुद्यावर नंतर भाजपा गप्प राहिली होती.
नालेसफाईचा मुद्दा शांत झाला असतानाच 18 जूनला कोंग्रेसचे नगरसेवक मोहसिन हैदर यांनी पत्रकार परिषद् घेवुन नालेसफाई बोगस असल्याचे उघड केले. नालेसफाईचा गाळ मुंबईमधे टाकण्यास जागा उपलब्ध नसल्याने कंत्राटदारानी गाळ टाकण्यासाठी मुंबई बाहेर जागा बघावी अशी अट घालण्यात आली होती. या अटीची पुर्तता करताना अनेक कंत्राटदारानी खोट्या सह्या शिक्का लेटरहेड असणारी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे हैदर यांनी पुरावे पत्रकाराना दाखवले होते. कागदपत्रे बोगस असल्याने मुंबईबाहेर गाळ गेलाच नसल्याने नालेसफाईच्या नावाने दोन वर्षात 291 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे हैदर यांनी सांगितले. कंत्राटदारानी जे पुरावे कागदपत्रे दिली तिकडे जाऊन पाहणी करून तिकडच्या ग्रामपंचायतीने त्यांच्या परिसरात कोणताही गाळ टाकला नसल्याचे व् कंत्राटदारानी दिलेले पुरावे बोगस असल्याचे पुरावे पालिका आयुक्त अजोय मेहता याना देत असून बोगस कागदपत्रे देवून कंत्राट मिळवून भ्रष्टाचार करणारयांची लाच लुचपत विभाग, सिबीआय किंवा एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, कंत्राटदारांची बिले थांबवावी अशी मागणी हैदर यांनी केली आहे.
मोहसिन हैदर यांनी पालिकेतील नालेसफाई चा भ्रष्टाचार बाहेर काढला असतानाच मुंबई मधे मुसळधार पाउस पडायला सुरुवात झाली होती. हा मुसळधार पाउस 19 जूनलाही पडत राहिला. मुंबईमधे पाणीचपाणी झाले. नागरिक त्रस्त झाले. आता आपले पितळ उघडे पडेल याची भीती वाटल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस, उद्धव ठाकरे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या पालिकेतील सहकारयाना घेवुन पालिकेच्या आपातकालीन विभागाच्या वातानुकुलीत असलेल्या कार्यालयात बसून पाहणी केली. अशी पाहणी करतानाही त्याची मीडिया मधे चांगली प्रसिद्धि कशी होईल याची काळजी घेतली. वास्तविक पाहता या नेत्यानी वातानुकुलीत कार्यालयात बसून पाहणी करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत कशी मिळेल याकडे लक्ष दिले असते तर लोकाना दिलासा मिळाला असता.
काही दिवसापूर्वी नालेसफाई चांगली झाली झाली असे प्रमाणपत्र देणारया उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीवर सगळे खापर फोडले आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी पुन्हा नालेसफाईच्या चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आंबेरकर यांनीही नालेसफाई झाली नसल्याने मुंबईमधील गाळ गेला कुठे असा प्रश्न उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मोहसिन हैदर यांनी मिळवलेले कागदपत्रे याचा विचार करून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या चौकशीसाठी पुढाकार घ्यायला हवा. चौकशी केल्यावर अहवाल लाल फितित धुळ खात पडणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. दोषी अधिकारयाना कायमस्वरूपी घरी बसवावे दोषी कंत्राटदाऱाना काल्या यादीत टाकावे मुंबईकर लोकांचा पैसा काम न करता लुटला आहे तो वसूल करावा. अन्यथा टक्केवारीचा पैसा वरिष्ठ आधिकारयापर्यन्त पोहोचतो या चर्चेत तथ्य आहे असा संदेश लोकांपर्यंत जाईल.
मुंबई महानगर पालिकेत गेले 22 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेच्या काळात सातत्याने 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन थाटामाटात साजरा केला जात होता. यावर्षी मात्र पावसाने मुंबई मधे सर्वत्र पाणी तुंबल्याने सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन रद्द करण्याची नामुष्की शिवसेनेवर आली आहे. निसर्गाने शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेतील अधिकारी नाले सफाईचे नाटक करत आहेत. नालेसफईच्या नावाने नागरिकांचे करोडो रुपये वाया जात आहेत. परंतू या मधून सत्ताधारी, पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांची घरे मात्र भरली जात आहेत. सत्ताधारी शिवसेनेलाही यामधील टक्केवारी पोहोचत असल्याने भ्रष्टाचार होत असताना शिवसेना बघ्याची भूमिका घेत आहे. कारवाई केल्यास आपला हिस्सा मिळने बंद होइल या भीतीने सत्ताधारी अधिकारी आणि कंत्राटदारांची पाठराखण करत आहे. पालिका अधिकारी आणि कंत्राटदार नालेसफाईच्या नावाने निसर्गाशी खेळत आहेत. निसर्गाशी खेळ झाल्याने मुंबई मधे 2005 मधे महापुर आला होता. आताही दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, आता तरी सुधरा, असा इशारा निसर्गाने दिला आहे. सत्ताधारी शिवसेनेला मुंबईमधे तुंबलेल्या पाण्यामुले आपला वर्धापन दिन रद्द करावा लागला आहे यामधून काही धडा घ्यायची गरज आहे. अन्यथा येत्या 2017 च्या महानगर पालिकेच्या निवडणुुकित मुंबईकर शिवसेनेचीही कोंग्रेस करतील यात शंका नाही.
अजेयकुमार जाधव
मो. 9969191363
मो. 9969191363


No comments:
Post a Comment