मुंबई (प्रतिनिधी): बेस्ट प्रशासनाने दैनंदिन बस पासाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून सदर प्रस्ताव आज बेस्ट समिती सभेत मांडण्यातआला . सदर प्रस्ताव आज समितीने मंजूर केला असल्याने बेस्ट प्रवाशांना त्याचा फायदा मिळून बेस्टची प्रवाशी संख्या ही वाढणार आहे.
१ एप्रिल २०१५ पासून बेस्टने केलेल्या दरवाढीच्या वेळी दैनंदिन पासच्या दरातही वाढ केली होती. या दरवाढीच्या अंमलबजावणी नंतर प्रवासांच्या संखेत कमालीची घट झाली. ही बाब विचारात घेऊन बेस्ट प्रशासनाने शहर- उपनगरे आणि उपक्रमच्या बसगाड्या ज्या-ज्या ठिकाणी प्रवर्तित होतात. अशा संपूर्ण परिसराकरिता ७० मुख्यवर्गाचा बसपास उपलब्ध होता. परंतु हा बसपास घेणाऱ्या प्रवाशांच्या संखेत झालेली घट विचारात घेऊन शहरी क्षेत्राकरिता ४० रुपये व उपनागरीये क्षेत्राकरिता ५० रुपये मुख्य वर्गाचे नवीन दैनंदिन बसपास सुरु करण्याचा निर्णय घेतला.
शहरी क्षेत्राचा ४० रुपयाचा दैनंदिन पास हा दक्षिण मुंबईतील नेव्हीनगर, कफपरेड पासून मध्य मुंबईतील माहीम, सायन, प्रतीक्षा नगर, अन्टोप हिल, वडाला ट्रक टर्मिनल या परिसराकरिता वैध असणार आहे. तर उपनगरा करिता असलेला ५० रुपयांचा दैनंदिन बसपास माहीम, सायन पलीकडच्या उत्तरेकडील पूर्व, पश्चिम व मध्य उपनगराकरिता वैध राहणार आहे. मात्र शहर व उपनगरे तसेच महानगरपालिका हद्दीबाहेरील परिसराकरिता तसेच वातानुकुलीत बससेवा वगळता अन्य बस प्रवर्तताच्या संपूर्ण क्षेत्राकरिता ७० रुपये मुख्यवर्गाचा विधमान बसपास वैध राहणार आहे.
१२ वर्षाखालील मुलांना दैनंदिन बसपास कमी दराने
प्रौढांसाठी असलेले दैनंदिन बसपास ४०,५० व ७० रुपयांचे असून मात्र यावेळी प्रथमच बेस्टने १२ वर्षाखालीली मुलांकरिता अनुक्रमे २० रुपये, २५ रुपये आणि ३५ रुपये असणार आहे. तसेच वातानुकुलीत बससाठी प्रौढांसाठी असणारा २०० रुपयांचा दैनंदिन पास १२ वर्षाखालीली मुलांसाठी १०० रुपये असेल.