एकाही मुलाला शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही - शिक्षणमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2015

एकाही मुलाला शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही - शिक्षणमंत्री

मुंबई : शिक्षणापासून वंचित असलेल्या मुंबईतील मुलांशी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी संवाद साधून त्याची माहिती शिक्षकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून अशा मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणून एकाही मुलाला राज्य सरकार शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्हच्र्युअल क्लासरूम स्टुडिओमधून बृहन्मुंबई महापालिकेच्या ४८0 शाळांतील विद्यार्थ्यांशी शाळा प्रवेशाच्या प्रथम दिवशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

व्हच्र्युअल क्लासरूमच्या माध्यमातून प्रथमच आपल्याशी संवाद साधत असून संवादाची ही सुरुवात झाली आहे. यानंतरच्या काळात प्रत्यक्ष आपल्या शाळेत येऊन आपल्याशी हितगूज करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण जेव्हा बाजार, मार्केट व अन्य ठिकाणी गेल्यानंतर रस्त्यावर आईवडील काम करीत असलेल्या ठिकाणी त्यांचे मूल जेव्हा खेळत असते, तेव्हा त्या खेळणार्‍या मुलाला तू शाळेत जातो का? असा प्रश्न विचारा. त्या विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती तुम्ही तुमच्या वर्गशिक्षकांना द्या, शिक्षकांकडून ती माहिती आमच्यापर्यंत पोहचेल. जेणेकरून अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम राज्य शासन करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. या वेळी एका विद्यार्थिनीने विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षणमंत्री म्हणून आपण काय केले, असा प्रश्न विचारला असता शिक्षणमंत्र्यांनी यासाठी समिती गठित केली असून समितीचा अहवालानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात यासंबंधीचे धोरण जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS