आपत्कालीन परिस्थितीबाबत सुनिश्‍चित कार्यपद्धतीची आवश्यकता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2015

आपत्कालीन परिस्थितीबाबत सुनिश्‍चित कार्यपद्धतीची आवश्यकता

मुंबई : 'कोणत्याही आगीच्या घटनेबाबत किंवा आपत्कालीन परिस्थितीबाबत संबंधित संस्थेतील कोणत्या स्तरावरील अधिकार्‍याने मुंबई अग्निशमन दल, आपत्कालिन व्यवस्थापन कक्ष यांना कळवावे, याबाबत 'सुनिश्‍चित कार्यपद्धती' (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर-एसओपी) असण्याची आवश्यकता आहे, असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. 

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये शनिवारी-रविवारी तेलवाहिनीला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्‍वभूमीवर मेहता यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात सर्व संबंधित संस्थांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची विशेष बैठक आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) संजय देशमुख, औद्योगिक सुरक्षा संचालकांचे प्रतिनिधी यांच्यासह मुंबई पोर्ट ट्रस्ट, बीपीसीएल आणि एचपीसीएल, आरसीएफ आदी संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई पोर्ट ट्रस्टने पुढील एक महिन्याच्या कालावधीत त्यांच्या सर्व यंत्रणाबद्दल आवश्यक त्या चाचण्या व तपासण्या करून घेत संबंधित निकषांनुसार कार्यवाही तातडीने पूर्ण करावी तसेच सर्व तेलवाहिन्या गळतीमुक्त होण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करून तेलवाहिन्या गळतीमुक्त झाल्याबाबतचे ट्रस्टच्या सर्वोच्च अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेला एक महिन्याच्या आत द्यावे, असेही आदेश आयुक्तांनी दिले

Post Bottom Ad

JPN NEWS