दहा वर्षांत चार धरणे बांधण्याचा पालिकेचा विचार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दहा वर्षांत चार धरणे बांधण्याचा पालिकेचा विचार

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबई करांची पाण्याची ताण भागविण्यासाठी पालिका आता पुढे सरसावली असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन म्हणजेच 2040 पर्यंत मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे त्याप्रमाणे येत्या दहा वषाॅत चार धरणे बांधण्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे पालिकेने नियोजन सुरू केले आहे या धरणातून मुंबईकरांना दोन हजार 881 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना 24 तास पाणी मिळणार आहे .

देशात सवाॅत मोठी पालिका म्हणून गनली जाणारी पालिका मुंबई तील सुमारे दिडकोटी जणतेला मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांतून दररोज तीन हजार 570 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करत आहे.मुंबईला चार हजार 200 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. लोकसंख्येचा विचार करता ती भागवणे सध्या अशक्‍य आहे. त्यामुळे मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी नवी चार धरणे बांधण्यात येणार आहेत. या धरणांमध्ये पिंजाळ आणि गारगई या दोन धरणांचा समावेश आहे. दमणगंगा आणि पिंजाळ या प्रकल्पांवर आणखी दोन धरणे बांधण्यात येणार आहेत.

पिंजाळ प्रकल्पांतर्गत पिंजाळ नदीवर धरण बांधले जाईल. त्यात पिंजाळ धरण ते गुंदवली या सुमारे 64 किलोमीटर इतक्‍या लांबीच्या बोगद्याचा समावेशही आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्‍यातील खिडसे परिसरात हे धरण बांधण्यात येणार आहे. सुमारे 2 हजार 55 हेक्‍टर परिसरात पिंजाळ प्रकल्पाचा विस्तार आहे. त्यासाठी 14 हजार 390 कोटी रुपये खर्च होणार आहे. 2017 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता खात्याने दिली. या प्रकल्पात 11 गावे विस्थापित होणार आहेत.त्यांची लोकसंख्या चार हजार 514 इतकी आहे.

गारगई प्रकल्पांतर्गत गारगई नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. गारगई आणि मोडक सागर या दरम्यान सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा बोगदाही बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सहा गावे बाधित होणार आहेत. त्यांची लोकसंख्या 770 आहे. या प्रकल्पाचा खर्च एक हजार 820 कोटी आहे. गारगई आणि पिंजाळ ही दोन्ही धरणे पालघर तालुक्‍यात आहेत. या प्रकल्पांसाठी जमीन संपादनाची कार्यवाही पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या चारही धरणांची कामे 2017-18 मध्ये सुरू होणार आहेत. 2023 ते 25 पर्यंत हे पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होणार
आहेत.
नदीजोड प्रकल्पात दोन धरणेदमणगंगा आणि पिंजाळ नदीजोड प्रकल्पांतर्गत दोन धरणे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्‍यातील भुगड गावाजवळ दमणगंगा नदीवर 851.50 मीटर लांबीचे धरण आणि पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्‍यातील बेहाडपाडा या गावाजवळील वाघा नदीवर 618.20 मीटर लांबीचे खारगीहिल धरण बांधण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पात भुगड धरणापासून खारगीहिल धरणापर्यंत 17.50 किलोमीटरचा जलबोगदा तसेच खारगीहिल ते पिंजाळ धरणापर्यंत 25.25 किलोमीटरचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळावी यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. प्रकल्पातील अडचणींचा अभ्यास करण्यासाठी तसेच प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा याचा अभ्यास करण्यासाठी मे.वॅपकॉस या सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण (नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) आणि पालिका यांच्या समन्वयाने होणार आहे

पाणीपुरवठ्याची सद्यस्थितीपाण्याची गरज - 4200 दशलक्ष लिटर
दररोजचा पुरवठा  - 3700 दशलक्ष लिटर

चार प्रकल्पातून रोज मिळणारे पाणीगारगई - 440 दशलक्ष लिटर
पिंजाळ - 865 दशलक्ष लिटर
दमणगंगा पिंजाळ जोड प्रकल्पाच्या दोन धरणांतून प्रत्येकी 1586 दशलक्ष लिटर -  एकूण 2891 दशलक्ष लिटर

प्रस्तावित चार धरणांचा अभ्यास करण्याचे काम सुरू आहे. केंद्राच्या पर्यावरण खात्याच्या परवानग्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे. या धरणांची कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील अशी माहिती जलअभियंता प्रमुख रमेश बांबळे यानी दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages