आता पालिकेत सल्लागार दिसणार नाही - सल्लागारांच्या सेवा संपुष्टात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2015

आता पालिकेत सल्लागार दिसणार नाही - सल्लागारांच्या सेवा संपुष्टात


मुंबई / प्रतिनिधी - मुंबई मधील विकास कामांसाठी सरसिपणे नियुक्ती करण्यात आलेल्या बाहेरील सल्लागारांचा प्रत्यक्ष विकास कामात काहीही उपयोग होत नाही त्याच्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.मुंबईकरांचा कराचा पैसा त्यांच्यावर वाया जात आहे हा पैसा वाचवण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता पुढे सरसावले असून विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार यांच्या सेवा एक जून पासून संपुष्टात आणण्याचा निर्णय पालिका आयुक्त मेहता यांनी घेतला आहे. त्यामुळे आता सल्लागार पुढे पालिकेत दिसणार नाही

पालिकेतून सेवा निवृत्त झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार यांची नेमणूक सरसिपणे करत आहे गरज नसतानाही ललहान मोठ्या कामासाठी त्यांच्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी पालिका करत आहे लाखो रुपये घेऊनही हे सल्लागार काम व्यवस्थित करत नाहीत पालिका विकासाची कामे हाती घेताना सल्लागारांची निवड करून त्यांच्या सल्याने कामे करते तथापि काही वेळेस सल्लागार प्रत्यक्ष विकास कामे होत असलेल्या ठिकाणांवर न जाता उपलब्ध दर-तऐवज , आकडेवारी इत्यादीच्या आधारे अहवाल तयार करतात त्यामुळे असे अहवाल चुकीचे ठरतात आणि पालिकेचे  मोठे नुकसान होत आहे आहेत हे नुकसान टाळण्यासाठी आणि मुंबई करांचा कराचा पैसा वाचवण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी सात एप्रिल रोजी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे केली होती त्याप्रमाणे पालिका आयुक्त मेहता यांनी गेल्या पाच वर्षापासून कायॅरत असलेल्या विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार या अधिका-यांची नियुक्ती एक जून 2015  पासून संपुष्टात आणण्याचे तसेच विविध विभागामध्ये सल्लागार म्हणून नियुव-ती करण्यात आलेल्या बाहेरील व्यक्तींची सेवा खंडित करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे या आयुक्तांच्या निर्णयाचे अभिनंदन पालिका सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS