बाधित झोपडीधारकांसाठी रिपाइंचा 'एस' विभागावर मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2015

बाधित झोपडीधारकांसाठी रिपाइंचा 'एस' विभागावर मोर्चा

मुंबई / प्रतिनिधी - तानसा पाइपलाइन व मिठी नदीमध्ये बाधित झालेल्या झोपडीधारकांना अपात्र करून मनपा 'एस' विभागाने केलेल्या अक्षम्य अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि पवईकरांना भेडसावणार्‍या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या विरोधात रिपाइंच्या वतीने भांडुपच्या 'एस' विभाग कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.

पवईत विभाग हा आजवर विविध प्रश्नांनी ग्रासलेला असताना मूलभूत सुविधांचा अभाव आणि विनाकारण खच्चीकरण महापालिकेकडून होत आहे. नागरी सुविधांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पवईकरांनी केला आहे. एकूण १६ नागरी सुविधांची मागणी करण्यात आली आहे मागणीचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी या १६ मागण्या लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्‍वासन आंदोलकांना दिले. रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, देविदास गायकवाड, बाबुराव बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. 

Post Bottom Ad

JPN NEWS