मुंबईतील नालेसफाईची निष्पक्ष चौकशी करणार - पालिका आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2015

मुंबईतील नालेसफाईची निष्पक्ष चौकशी करणार - पालिका आयुक्त


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या नालेसफाईवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले असून पालिकेवर टीका होत आहे. याच नालेसफाई वरून महानगर पालिकेच्या सभागृहात चर्चा होऊन आयुक्तांनी नालेसफाईबाबत निवेदन करावे अशी मागणी करत सभागृह तहकूब करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नालेसफाईची निष्पक्ष चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन सभागृहाला दिले आहे.

मुंबई महानगर पालिका प्रशासनाने मुंबईमधे नालेसफाई झाल्याचा दावा केला असतानाच पहिल्या पावसामधेच मुंबई तुम्बली. मुंबई तुम्बल्याने नालेसफाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. पालिका सभागृहातही यावरून सोमवारी गोंधळ होऊन सभागृहात उत्तर द्यायला पालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त उपस्थितीत नसल्याने सभागृह तहकूब करण्यात आले होते. सोमवारी तहकूब करण्यात आलेले सभागृह मंगळवारी सूरु झाल्यावर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपले निवेदन केले. यावेळी बोलतान पावसाळ्यात मुंबई तुंबले त्यावेळी माझ्यासह पालिकेचे अधिकारी पाण्यामध्ये आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून लोकांचा त्रास कमी करण्याचे प्रयत्न करत होते. अश्या अधिकाऱ्यांचा  कर्मचाऱ्यांचा मला अभिमान  असल्याचे सांगत ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कामात कुचराई केली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. नालेसफाईवरून अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने नालेसफाईबाबत निष्पक्ष चौकशी केली जाईल. या चौकशीचा आल्यावर अहवाल आल्यावर किती गंभीर प्रकार आहे याची शहानिशा करून कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकायचे, कंत्राटदारावर एफआयआर दाखल करायचा, बिले थांबवायची याचा निर्णय घेतला जाईल असे आयुक्तांनी सभागृहात सांगितले. 

१९ जून रोजी झालेल्या पावसावेळी पंपिंग स्टेशन बंद पडले, पाण्याचा योग्य रित्या निचरा झाला नाही याची चौकशी करण्यात येईल. पुढील वर्षी पाणी साचू नये यासाठी प्रयत्न केले जात असून याचाच एक भाग म्हणून येत्या नोव्हेंबर पूर्वी गजदरबंद पंपिंग स्टेशन सुरु करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पाणी साचले त्या ठिकाणच्या सहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागात पाणी साचू नये म्हणून काय करता येईल याबाबत सूचना करण्यास सांगण्यात आल्या आहेत. पाणी साचू नये म्हणून काय उपाय योजना करता येतील त्याची माहिती येताच कारवाई करण्यात येईल. प्रत्येक उप आयुक्तांनी आपल्या विभागात पाणी त्यावेळी काय केले याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुंबईमध्ये पावसावेळी आणि पावसानंतर होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, ग्यास्ट्रो, टायफाईड यासारखे रोग निर्माण होतात यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून पाण्याचे नमुने चाचणी करून घेण्यास सांगितले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS