पालिका विद्यार्थ्यांचा गणवेश अधिक दराने खरेदी करण्याचा डाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2015

पालिका विद्यार्थ्यांचा गणवेश अधिक दराने खरेदी करण्याचा डाव


मुंबई महानगपालीकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे गणवेश तब्बल सुमारे ९ कोटी रुपये अधिक देवून विकत घेतले जाणार धक्कदायक माहिते उजेडात आली आहे. सर्वात कमी दर असलेल्या निविदाकाराची निविदा जाणीवपूर्वक तांत्रिक दृष्ट्या बाद करून आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला ९ कोटी रुपये जास्त देवून जनतेचा पैसाहावर डल्ला मारण्याचे काम काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून केले असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात द इनोव्हेटर कंपनीने आयुक्तांना लेखी तक्रार दिली आहे.


पालिका विद्यार्थ्यांना शालेचे गणवेष पुरविण्यासाठी काढलेली निविदांमध्ये सियारम  मिल लि., लाद्रिया टेक्सटाइल्स प्रोजेक्ट्स प्रा. लि. आणि टेक्नोक्राफ्ट असोसिएट या कंपन्यांनी निविदा सदर केल्या होत्या. त्यातील सियाराम सिल्क मिल्स लि. या कंपनीची निविदा सर्वात कमी रक्कमेची ६७ कोटी ९७ लाख १५ हजार ३२० रुपयांची असून त्यानंतर  लाद्रिया टेक्सटाइल्स प्रोजेक्ट्स प्रा. लि.ची ७६ कोटी ८९ लाख १७ हजार ५७१ रुपयांची असतानाही काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक  लाद्रिया टेक्सटाइल्स कंपनीची ९ कोटी अधिक असलेली निविदा मंजूर होण्यासाठी सर्वात कमी दराच्या निविदाकाराला डावलण्याचा कात यशस्वी केला आहे.
               
या विरोधात 'द इनोव्हेटर ' या संस्थेने पालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून त्यांनी सीव्ही सी गाईडलाईन नुसार गणवेषाच्या कपड्यांची टेंडर संम्पल चे नमुने टेस्टिंगला पाटविणे  असून मात्र  निविदा मंजूर  पहिल्या निविद्काराचे टेंडर संम्पल  टेक्सटाईल्स कमिटी प्रभादेवी  पाठविण्यात आले. या  संबंधिताना हाताशी धरून सदर संम्पल फेल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सेन्ट्रल व्हीजीलन्स कमिशन (सीव्हीसी) च्या गाईड लाईन नुसार टेंडर काढले असल्याने टेंडर संम्पलला महत्व नसते तर सर्वात कमी निविदेकाराची निविदा मान्य केली जाते. श्रीराम मिळणे तक्रार केल्यावर पालिकेने सीव्हीसी गाईडलाईन प्रमाणे टेंडर काढण्याचे लेखी कळविली असले तरी तशी वस्तुस्थिती नसल्याचा आरोप नुसार टेंडर 'द  इनोव्हेटर 'कंपनीने केला आहे.
       
दरम्यान, पालिकेचे परिपत्रक नं.सीए/एफबीएम/४२ दिनाक १ मार्च २००८ नुसार टेंडर भरणाऱ्या कंत्राटदाराने स्वत: संम्पल टेस्ट करून देण्याबाबत स्पष्ट असताना टेंडर संम्पल पालिका अधिकारी नंतर कसे तपासणीसाठी पाठवू शकतात असा सवाल करीत त्यांनी याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आयुकाकडे पत्राद्वारे केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS