नालेसफाईचा पैसा गेला कुठे याची एसीबीकडून चौकशी करा - विरोधकांची मागणी - सभागृह तहकूब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2015

नालेसफाईचा पैसा गेला कुठे याची एसीबीकडून चौकशी करा - विरोधकांची मागणी - सभागृह तहकूब

मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबईमधील नालेसफाईच्या कामा करिता मुंबई महानगर पालिका प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १५० कोटीहून जास्त रक्कम खर्च करूनही नालेसफाई समाधान कारक झालेली नाही. मग हा पैसा गेला कुठे ? असा प्रश्न उपस्थित करत नालेसफाईसाठीचा पैसा कुठे गेला याची चौकशी पोलिसांच्या लाच लुचपत विभागाकडून करावी अशी मागणी पालिकेतील नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका सभागृहात केली. पालिका सभागृहात निवेदन करताना प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करत आहे असा आरोपही आंबेरकर यांनी केला. मात्र आयुक्त व अतिरिक्त आयुक्त सभागृहात उपस्थित न राहिल्याने आंबेरकर यांनी सभा तहकुबी मांडली असता सत्ताधार्यांनी तहकुबील पाठींबा देत सभा तहकूब केली. 

पालिका प्रशासनाने नालेसफाई केल्याचा दावा केला आहे त्याबाबत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी शिवसेना समाधानी असल्याचे म्हटले होते. दोन दिवसापूर्वी पंपिंग स्टेशनचे उद्घाटन करताना मुंबईकर जनतेचा पैसा वाया जाणार नाही असा दावा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. या नंतर दोनच दिवसात मुंबई पावसाच्या पाण्याने तुंबली. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि प्रशासनाने मुंबई तुंबवून दाखवली असा आरोप आंबेरकर यांनी केला. मागील आयुक्त सीताराम कुंटे यांनी मिठी नदीबाबत कित्तेक योजना आणल्या त्या योजना गेल्या कुठे असा प्रश्न आंबेरकर यांनी उपस्थित करत गाळात हात गुंतलेल्यांची आणि मुंबई मधील गाळ कोठे टाकला गेला याची सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी आंबेरकर यांनी केली. सत्ताधार्यांना गेल्या ९ वर्षात ८ पैकी ४ उद्दंचन केंद्र बांधता आली याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या धनंजय पिसाळ यांनी केली. समाजवादीच्या रईस शेख यांनी मुंबई महानगर पालिका सत्ताधारी चालवत नसून आयुक्त चालवत असल्याचे सांगत नगरसेवक मुंबई चालवण्यात अपयशी ठरत असल्याची टीका केली. सभागृहात नालेसफाईच्या गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना आंबेरकर यांच्या आरोपानंतर सभागृहात गोंधळ घालण्यात आला. सदर गोंधळाचा फायदा घेत आयुक्त अजोय मेहता सभागृहातून निघून गेले. आयुक्तांच्या जागी असलेल्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे याही काही वेळाने निघून गेल्या. सभागृहात चाललेली चर्चा ऐकायला आयुक्त दाराजाचा अधिकारी उपस्थित नसल्याने विरोधकांनी आयुक्तांना बोलावण्याची मागणी केली परंतु आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त सभागृहात आले नसल्याने या प्रकाराचा निषेध करत सभागृह तहकूब करण्याची मागणी विरोधी पक्ष देवेंद्र आंबेरकर यांनी केली. या सभा तहकुबीला सत्ताधारी शिवसेना भाजपाने पाठींबा दिला यावर महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभा तहकूब केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS