चार जिगरबाज अधिकाऱ्यांचा घात कशामुळे झाला याची माहिती त्वरित दयावी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2015

चार जिगरबाज अधिकाऱ्यांचा घात कशामुळे झाला याची माहिती त्वरित दयावी

मुंबई ( प्रतिनिधी ) - काळबादेवी येथील गोकूळ निवास इमारतीला लागलेल्या आगीचा अहवाल पालिकेने प्रसिद्ध केला पण या अहवालात जिगरबाज चार अधिका-यांचा घात कशामुळे झाला त्याचा उल्लेख या अहवालात केलेला नाही त्याची माहिती त्वरित देण्यात यावी आणि अग्निशमन दलातील जवानांच्या मागण्यांकडे जातीनिशी लक्ष देऊन सोडवाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण पालिका कामगार कर्माचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. 

काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे चार जानबाज अधिकारी कामी आले त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक करून तीन आठवडयात अहवाल सादर केला पण हा अहवाल अर्धसत्य असून या अहवालात जिगरबाज चार अधिका-यांचा घात कशामुळे झाला त्याचा उल्लेखही केलेला नाही त्याची माहिती देण्यात यावी तसेच अग्निशमन दलातील जवानांच्या मागण्यांकडे जातीनिशी लक्ष देऊन सोडवाव्यात. जवान व अधिकारी यांना जीवन विमा संरक्षण ताबडतोब काढावा, वेतनामध्ये समाविष्ट करण्यात आलेला रिस्क पे भत्ता देण्यामध्ये समानता असावी आगीशी लढणाऱ्या जवानांना कमी भत्ता व बाहेर राहून आदेश देणाऱ्या अधिकारी वर्गाला ज्यादा भत्ता ही विषमता दूर झाली पाहिजे आणि अग्निशमन दलातील सर्व जवानांना कर्तव्य भत्ता लागू करण्यात यावा असे जवानांच्या निगडित आठ मागण्या करण्यात आल्या आहेत.

दलातील रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावी व अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी प्रत्येक अग्निशमन केंद्रात एक व्यायाम शाळा तज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सह प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांची नियुक्ती व इतर शिफारसी अग्निशमन दलाची कार्यक्षमता वाढीसाठी निश्चित उपयोगी पडणा-या आहेत कामगार संघटना अग्निशमन दलामध्ये बेशिस्तपणा आणण्याचे काम करीत नसून स्वार्थी भ्रष्ट व गटबाजी मध्ये गुंतलेले वरिष्ठ अधिकारी हेच याला मुख्यता जबाबदार आहेत. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी अग्निशमन दलाकडून एनओसीचे अधिकार काढून घ्यावे धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या या जवानाच्या इमारत दुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य दयावे अशा सुचना व मागण्या दिलीप नाईक यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलेल्या पत्राद्वारे केल्या आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS