रुग्णालयातील कामगारांच्या प्रश्नाबाबत बैठक बोलवा अन्यथा आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2015

रुग्णालयातील कामगारांच्या प्रश्नाबाबत बैठक बोलवा अन्यथा आंदोलन


मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयाचे सक्तीने स्थलांतर करण्यात आले. रुग्णालयाच्या स्थलांतरामुळे कर्मचाऱ्यांच्या निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे अन्यथा युनियनला आंदोलन करावे लागेल असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे. 

मुंबई महानगर पालिकेच्या रुग्नालाया व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संचालक, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये यांनी गेल्या दीड वर्षात वेळोवेळी बैठका घेवूनही रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. यामुळे सर्वत्र उदासीनता व असंतोष पसरला आहे. १३ मार्च २०१४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने केलेली नाही. हि दुर्दैवी बाब असल्याचे कर्मचारी युनियनने म्हटले आहे. कुर्ला भाभा रुग्णालय सक्तीने पडक्या इमारतीचे भय दाखवून खाली करीत असताना सन २००९ - १० मध्ये उद्घाटन केलेल्या नवीन बांधलेल्या इमारतीत ज्या ठिकाणी अपघात विभागाच्या शेजारी मोठा हॉल मोकळा ठेवला आहे. त्या ठिकाणी आस्थापना विभाग व पूर्व उपनगरातील रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या सेवा सर्व्हिस रेकोर्ड विभाग हलवण्यात आला आहे. यामुळे लांबून येणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना वेळोवेळी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय येथे दैनंदिन आस्थापना विषयक बाबींसाठी ये- जा करणे शक्य नसल्याचे युनियनने म्हटले आहे. कामगार संघटनांना विचारात न घेता कामगार विरोधी निर्णय घेण्याची परंपरा यापुढे चालू ठेवल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा युनियनने आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS