तुडूंब भरून वाहनाऱ्या तलावावर कंत्राटदाराचा कृत्रिम पावसाचा प्रयोग - कोट्यवधी रुपयाचा चुराडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 June 2015

तुडूंब भरून वाहनाऱ्या तलावावर कंत्राटदाराचा कृत्रिम पावसाचा प्रयोग - कोट्यवधी रुपयाचा चुराडा


मुंबई (प्रतिनिधी)- पावसाळ्यात जलायश तुंडूंब भरून वाहत असतानाही कंत्राटदाराने कृत्रिम पावसाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकलले आहेत. या स्वरूपाची माहिती पालिका मुख्य लेखा परिक्षकांनी 2010-2011 च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. त्यावरून आज स्थायी समितीत कृत्रिम पाऊस चांगलाच बरसला.


महापालिकेने 2009 साली मॅकॉनी एंटरप्रायझेस आणि अग्नि एव्हिएशन या कंपनीला कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे कंत्राट दिले होते. यामध्ये 20 प्रयोगाकरिता 19.06.410 कोटी रुपये खर्च ठरविण्यात आला होता. पावसाचा विलंब झाल्याने हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मोडक सागर धरणाने 5 ऑक्टोबर रोजीच पातळी ओलांडली होती. मात्र, तरीही 6 ऑक्टोबरला कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आल्याचा उल्लेख लेखापरिक्षांनी केला आहे. यावेळी सहाय्यक अभियंता तानसा व मोडकसागर यांनी मंजूर कसे काय केले, असा सवाल यापरिक्षकातून केला आहे. तसेच कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यांनतर उपकरणे खरेदीकरिता 49 लाक 612 रुपये खर्च केल्यामुळे त्याचा खुलासाच अभियंत्यांनी करावा, असे यात नमुद केले आहे. याबाबत स्थायी समितीत आज पडसाद उमटले. यावेळी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाची बिले वसूल करणाऱ्या मेकॉनी आणि अग्नि कंपनीची चौकशी करावी, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करून झालेला खर्च वसूल करावा, अशी मागणी भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. मात्र, याकडे तत्कालीन पालिका आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

कृत्रिम पावसाचे ताशेरे
- रडार उभारण्यापूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग का
- रडार कार्यान्वित नसतानाही 18 दिवसाचे एक कोटी 20 लाख रुपयाचे भाडे कंत्राटदारांकडून का वसूल केले नाही
- हवामान खात्याच्या सूचना मिळाल्यानंतर 10 मिनिटात प्रयोग होणे आवश्यक असताना 3 ते 4 तासानंतर उड्डाण का केले
- प्रयोगाचे दिवस आणि इतर दिवसात पडलेल्या पावसाच्या नोंदी नाही  

Post Bottom Ad

JPN NEWS