मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या कोंबड्याची वैद्यकीय तपासणी करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2015

मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या कोंबड्याची वैद्यकीय तपासणी करा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत येणाऱ्या कोंबड्याची देवनार येथील पशु वधगृहातील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी करून त्यांचे मटण वेगळे केल्यानंतरच मुंबईत पाठविण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिका सभागृहात ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. 



मुंबई दररोज राज्याच्या विविध भागांतून लाखो कोंबड्या विक्रीसाठी आणल्या जातात, मात्र मुंबईत येणाऱ्या कोंबड्यांची पशुवैधकीय अधिकाऱ्यामार्फत कोणतीही तपासणी केई जात नसल्यामुळे 'बर्ड - फ्लू ' सारख्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोंबडयांचे मटण वेगळे केल्यानंतर निघणारी पिसे आणि अन्य टाकावू अवयव गटारात किवा नाल्यात टाकले जातात. प्लास्टिक प्रमाणेच कोंबडयांच्या पिसांचेही बऱ्याच कालावधीपर्यंत विघटन होत नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. 

मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या सर्व कोंबडयांची वैद्यकीय तपासणी केल्यास ' बर्ड-फ्लू ' सारख्या रोगांना आळा बसेल आणि कोंबडयांच्या पिसांपासून आणि टाकाऊ अवयवांपासून भुकटी तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास पालिकेच्या मह्सुलातही वाढ होईल. सदर भुकटीचा वापर खतासाठी आणि पशु खाद्यासाठी होणार असल्याने त्याचाही अनेकांना लाभ होईल, असे विश्वासराव यांनी म्हंटले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS