सफाई कर्मचाऱ्यांच्या घरासाठी धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2015

सफाई कर्मचाऱ्यांच्या घरासाठी धरणे आंदोलन

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेमध्ये सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळावीत अशी मागणी कित्तेक वर्षे केली जात आहे. या मागणीला अनुसरून महाराष्ट्र सरकारने सफाई कर्मचाऱ्यांना घरे देण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने घरे देण्याचे जाहीर करुनही जीआर काढला जात नसल्याने सफाई कामगारांना घरे देण्यामध्ये अडचणी येत आहेत. सरकारने जाहीर केल्या प्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळवीत म्हणून जयश्री खाडिलकर आणि सफाई कामगार संघटनेचे नेते गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. 


मुंबई महानगर पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागात २८ हजार सफाई कामगार आहेत परंतू इतर विभागातील सफाई कामगारानाही घन कचरा विभागातील कामगारांप्रमाणे दर्जा मिळून त्यानाही सफाई कामगारांची घरे मिळवीत अशी मागणी आहे. पालिकेत घन कचरा आणि इतर विभागातील एकूण ४२ हजार सफाई कामगार आहेत या सर्वांना घरे दिली जावीत अश्या मागणीसाठी आंदोलन केले.

Post Bottom Ad

JPN NEWS