"अर्थतज्ज्ञाच्या हाती रेल्वेचा कारभार दिल्यावर दुसरे काय होणार?'
- संजय निरूपम यांची टीका
मुंबई : २७ जुन-मुंबई उपनगरीय रेल्वेच्या समस्येकडे रेल्वे मंत्रालयाचे अजिबात लक्ष नाही. रेल्वेमंत्रालयावर सुरेश प्रभंुचा प्रभाव जाणवत नाही. एखाद्या अर्थतज्ज्ञ किंवा चार्टर्ड अकाऊंटंटअसलेल्या व्यक्तिच्या हाती रेल्वेचा कारभार दिल्यावर दुसरे काय होणार, अशी तिखट प्रतिक्रियामुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी व्यक्त केली. रविवारी सकाळी चर्चगेटयेथे झालेल्या मुंबई लोकल अपघाताच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.
प्रभूंच्या काळात प्रथमच रेल्वे स्थानकातील फलाटावर लोकल चढली आहे, आज रविवारअसल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र इतर दिवशी ही दुर्घटना घडली असती तर मोठीहानी होण्याची भीती होती. प्रभूंनी या प्रकरणी कडक भूमिका घेऊन दोषींवर कडक कारवाईकरण्याची गरज आहे. लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, जर प्रभूंना त्याकडे लक्षदेण्यास वेळ नसेल व लोकलसेवा सुरळीत चालवता येत नसेल तर प्रभूंनी रेल्वेमंत्री पदाचाराजीनामा द्यावा अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.
मुंबई उपनगरीय रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफ लाईन असून या रेल्वेतून दररोज ७५ लाख प्रवासीप्रवास करत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामान्य प्रवाशांशी निगडीत असलेल्याव्यवस्थेकडे रेल्वे मंत्रालयाचे अजिबात लक्ष नाही हे योग्य नसल्याची टीका करत निरूपम यांनीकेंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंवर निशाणा साधला आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे केवळ भाषणबाजीकरण्यामध्ये मश्गुल आहेत. मुंबईतील पंच्याहत्तर लाख प्रवाशांसाठी त्यांनी गांभीर्याने कोणतेहीकाम केलेले नाही. रेल्वेमंत्री आम्हाला एकतर मुंबईतील एखाद्या तिकीट वेंडींग मशिनचेउदघाटन करताना दिसतात, किंवा वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर युनेस्कोच्या प्रतिनिधींसोबतस्थानकाची पाहणी करताना दिसतात ही कामे रेल्वेमंत्र्यांची नाहीत त्यांनी रेल्वे प्रवाशांच्यासुविधांशी संबंधित प्रकल्पांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सध्या रेल्वेशी संबंधित जेप्रकल्प सुरू आहेत किंवा पुर्ण होत आहेत ते आमच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प होते.सध्याच्या रेल्वे मंत्र्यांनी आतापर्यंत निव्वळ घोषणा केल्या, त्यांचा कोणताही प्रभाव रेल्वेच्याकारभारावर दिसत नाही, असे निरूपम म्हणाले.
मुंबईच्या रेल्वेसाठी एसपीव्ही म्हणजे स्पेशल पर्पज व्हेहिकल सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्रीकरतात. मात्र एमआरव्हीसी म्हणजेच मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण हे एसपीव्ही अगोदचअस्तित्वात आहे. एवढ्या साध्या गोष्टीची कल्पना रेल्वेमंत्र्यांना नसावी हे खरोखरच दुर्दैवी आहे.मुंबईत जरासा पाऊस पडला की रेल्वे सेवा ठप्प होते, पाऊस नसला तरी रेल्वे रुळ खचत आहेत,रेल्वेमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा,असे आवाहन संजय निरुपम यांनी केले आहे. एखाद्या अर्थतज्ज्ञाच्या किंवा चार्टर्डअकाऊंटंटच्या हाती रेल्वेचा कारभार दिल्यावर दुसरे काय होणार म्हणा, असा टोला लगावतनिरूपम यांनी गेला आठवडाभर सातत्याने रेल्वेच्या होत असलेल्या खोळंब्याबद्दल रेल्वेमंत्र्यांनाजबाबदार धरले आहे.

