पालिकेचा खड्डय़ाचाही दावा फोल कोट्यवधी रुपये खड्डय़ात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेचा खड्डय़ाचाही दावा फोल कोट्यवधी रुपये खड्डय़ात

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) -यंदा पहिल्याच पावसाने पालिकेचा नालेसफाई चा दावा फोल ठरल्या नंतर खड्डय़ाचाही दावा फोल ठरला आहे त्यामुळे मुंबईकरांच्या कराचा पैसा खड्डय़ात गेला आहे. दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करून ही मुंबईच्या रर-तांवर मोठ्या प्रमाणात खड्डय़ाचे सामाज्य निमाॅण झाले आहे. रर-ते खड्ड्यात की खड्डे रर-त्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असून पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकर चांगलाच हैराण झाला आहे.गेल्या 10 ते 12 दिवसात रर-तांवर 1073 खड्डे पडले त्यातील फक्त 656 खड्डे बुजवले 417 खड्डे अजूनही रर-तांवर आहेत निसर्गात जशी जैवविविधता पाहायला मिळते तसे मुंबईतील रस्त्यात , फुटपाथवर विविध लांबी , रुंदी, आणि उंचीचे खड्डे पाहायला मिळतात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खड्डय़ाचे प्रमाण दुप्पटीने आहे.



मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून. या राजधानीत सुमारे दिडकोटी जनता राहत आहे.मुंबईकरांना रर-ते चांगले मिळावेत म्हणून पालिकेने मुंबईतील रस्त्यांचा तीन वर्षांचा विकास आराखडा तयार करून सुमारे 900 रर-त्यांचा विकास केल्याचा दावा पालिका करत आहे. यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा खड्डे पडणारच नाही असे छातीठोकपणे सांगणा-या पालिकेच्या नाकावर टिच्चून खड्डय़ानी हजारी गाठली आहे तब्बल दहा ते बारा दिवसांमध्ये मुंबईच्या रर-तांवर एक हजार 73 खड्डे पडले असून मागील वर्षी याच कालावधीत केवळ  500 खड्डे पडले होते. त्यामुळे रर-तांसाठी खचॅ केलेले सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या विकास कामानंतरही रर-तांवर मोठ्या प्रमाणात खड्डय़ाचे सामाज्यनिमाॅन झाले आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पटीने वाढ आहे. मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये पहिल्याच पावसात वाहून गेले अनेक ठिकाणी नव्याने बांधलेल्या रर-तांवर तर काही ठिकाणी रर-तांचे सपाटीकरण केल्यानंतर तिथेही खड्डे पडल्याचे आढळून आले आहे. मागील दहा ते बारा दिवसातील परिस्थिती पाहता कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डय़ाची समस्या कमी झाल्याचे दिसून येत नसून ती दुप्पटीने वाढली आहे मुंबईच्या विविध रर-तांवर एक हजार 73  खड्डय़ाची नोंद झाली आहे.  खड्डे पडून रर-त्यांची चाळण झाली आहे. यातील फक्त 656 खड्डे बुजवले असून 417 खड्डय़ाचे जाळे अजून ही रर-तांवर आहेत गेल्या वर्षी याच कालावधीत 511 खड्डे होते तर यंदा तब्बल 1073 खड्डे आहेत.  तर गेल्या वर्षी याच कालावधीत 495  खड्डे बुजवले होते तर यंदा फक्त  656 खड्डे बुजवण्यात आले तर गेल्या वर्षी याच कालावधीत 16 खड्डे शिल्लक होते तर यंदा 417 खड्डे शिल्लक आहेत. 

पाॅटहोल ट्रेकिंग सिर-टीमच्या आधारे विभागातील खड्डय़ाचे फोटो काढून पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यावर आतापर्यंत एक हजार खड्डय़ाची तक्रार नोंदवली आहे. यातील 50 टक्के फोटो हे जागरूक नागरिकांनी काढून पाठवले आहेत तसेच रर-त्यांच्या विकास कामांसाठी तीन वर्षांचा सहा हजार कोटींचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये नोव्हेंबर पर्यंत 900 रर-ते पूर्ण केले जात असून सन 2014-15 मध्ये तरतूद केलेल्या  2315.31 पैकी 2049.74 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तर सन 2015 -16 या वषाॅत 3207.76 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातीलही काही कोटी रुपये खर्च करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत खचॅ करण्यात आलेले अडीज कोटी रुपये हे खड्डय़ात गेले आहेत. दरवर्षी मुंबईकरांच्या कराचा कोट्यवधी रुपये पाण्यात जात असताना ही पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मात्र मुगगिळून गप्प बसले आहेत त्यामुळेच प्रशासनाला वाव मिळत आहे पालिकेच्या पावलावर पाऊल ठेवून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष चालत असल्याने मुंबईकरांच्या  कराचा पैसा वाया जात आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages