रेल्वेत पर्यावरण दिन साजरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2015

रेल्वेत पर्यावरण दिन साजरा

मुंबई : वृक्षारोपण, कार्यशाळा, स्वच्छता आणि साफसफाई मोहीम आदी कार्यक्रमांचे आयोजन करून मध्य आणि पश्‍चिम रेल्वेत शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. सध्या मध्य आणि पश्‍चिम रेल्वेत रेल्वे प्रवासी उपभोक्ता पंधरवडा साजरा होत असल्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातच पर्यावरण दिन आल्यामुळे वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनविषयी कार्यशाळा, चर्चासत्र तसेच स्वच्छता आणि साफसफाई मोहीम आदी कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती. 

मध्य रेल्वेने पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा बचतीविषयी आयोजिलेल्या कार्यशाळेचे उद््घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी केले. ऊर्जा बचतीसाठी विविध उपाययोजना त्यांनी विषद केल्या. 'नॉईज रिडक्शन इन इंडियन रेल्वेज् : इम्प्रूव्ह डिझाईन ऑफ पॉवर कार्स' या विषयावर मुंबई आयआयटीचे प्रा. धनेश माणिक यांनी बहुमोल विचार मांडले. रेल्वेत आवाज मोठय़ा प्रमाणात निर्माण होत असल्याने तो कुठून जास्त येतो याचा शोध घेऊन तो कमी कसा करता येईल, याच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेने वृक्षारोपण, रेल्वे गाड्यांमधील बायो टॉयलेट्स, रेल्वेच्या रुग्णालयांतील कचरा व्यवस्थापन आदी विषयांवर सादरीकरण केले.

Post Bottom Ad

JPN NEWS