मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगातील पर्यटकांच्या दृष्टिकोनातून ४0 महत्त्वपूर्ण शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. पर्यटकांच्या बजेटला अनुकूल असलेल्या शहरांची एक यादी अलीकडेच करण्यात आली. यामध्ये मुंबईचा पाचवा क्रमांक लागला आहे.
'ट्रिप अँडवायझर'च्या एका अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालामध्ये मुंबईला हनोई (व्हिएतनाम), वार्सा (पोलंड), शर्म अल शेख (इजिप्त) आणि बँकॉक (थाइलंड) या शहरांनंतर स्थान देण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात महागडे शहर कानकून (मेक्सिको) हे आहे, तर स्वित्झर्लँडचे झुरिच दुसर्या स्थानावर आहे. त्यानंतर क्रमश: न्यूयार्क (अमेरिका), लंडन (इंग्लंड) आणि पुंटा काना (कॅरेबियन) या शहरांचा नंबर लागतो. अहवालामध्ये म्हटले गेले आहे की, मुंबईमध्ये तीन रात्री राहण्याचा खर्च ५३,९११ रुपये आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुंबई शहर हनोईच्या तुलनेमध्ये ३९ टक्के अधिक महाग आहे. टॅक्सीने प्रवासाच्या बाबतीत हे शहर बँकॉक, शर्म अल शेख आणि वार्सा या शहरांहून स्वस्त आहे. 'ट्रिप इंडेक्स'मध्ये जून ते ऑगस्ट या दरम्यान तीन रात्री राहण्याच्या खर्चाचा हिशोब देण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही चार स्टार हॉटेलमध्ये तीन रात्री राहण्याचा खर्च, तीन पर्यटन स्थळांचा प्रवास, प्रत्येक दिवसाचे जेवण व डिनर तसेच टॅक्सीच्या खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार हनोईमध्ये तीन रात्री राहण्याचा सरासरी खर्च ४६,६४५ रुपये आहे, तर मॅक्सिकोच्या कानकूनमध्ये तीन रात्री राहण्याचा खर्च १,२८,६२७ रुपये असल्याचे म्हटले आहे