मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाकडे पावसाची पाठ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2015

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाकडे पावसाची पाठ

मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबई सह राज्यात चांगला पाऊस पडत असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस पडत नसल्यामुळे तलावाची रि-थीती बिकट होत चालली आहे तलाव क्षेत्रात काल फक्त 33.20 मि .मि . पावसाची नोंद झाली.



मुंबई सह राज्यातील चाकरमान्याना चांगलेच झोडपून काढले मुसळधार कोसळण्या-या पावसामुळे चाकरमानी चांगलाच सुखवला मात्र मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर , तानसा ,विहार, भातसा, मध्यवैतरना आणि उच्चर-तर वैतरणा या तलावाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे तलावाची रि-थीती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशीच पाठ पुढे फिरवली तर मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. गेल्या बारा तासात विहार तलावात 17.20 , तुळशी तलावात 14.00 आणि भातसा तलावात फक्त 2 .00 असा एकूण 33.20 मि .मि . पावसाची नोंद झाली तर मोडकसागर , तानसा आणि अप्पर वैतरणा तलावात पावसाचा एकही थेंब पडला नाही .आता पयॅत फक्त मोडकसागर मध्ये 141 .00  तानसा मध्ये 63 .00 विहार मध्ये 207 .20  तुळशी मध्ये 275 .00  अप्पर वैतरणा मध्ये 166 .60 आणि भातसा मध्ये 162 .00 मि .मि . पावसाची नोंद झाली .

Post Bottom Ad

JPN NEWS