रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी समिती स्थापना करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी समिती स्थापना करा

Share This

मुंबई (प्रतिनिधी) - महापालिकेने पाणी बचतीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू केली. मात्र, पालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ही योजना बारगळली आहे. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी एका समितीची स्थापना करा, अशी मागणी सर्वपक्षीय समिती सदस्यांनी स्थायी समितीत केली.

मुंबई महापालिकेने स्वच्छ पाण्याची बचत व्हावी, यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना सुरु केली. त्यानंतर नवीन बांधकाम होणाऱ्या प्रत्येक इमारतीत त्याची अमंलबजावणी करण्याचे सूचना केली. मात्र, गेल्या आठ वर्षापासून ही योजना बारगळली आहे. याला पालिका प्रशासनाचे मुजोर अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप स्थायी समितीत केला. माजी महापौर सुनील प्रभू यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबतची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले होते. यावेळी केवळ माना डोलवून अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली असल्याचा मुद्दा भाजपाचे विनोद शेलार यांनी मांडला. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर पालिकेचा अंकूश ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. तर ही योजना असफल का होत आहे, याची समितीला माहिती सादर द्यावी. तसेच यात कोट्यवधीचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप मनसेने केला. पालिका सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगची अधिकाऱ्यांनाच माहिती नाही, याचे वाईट वाटत असल्याचे सांगितले. योजना खऱ्या अर्थाने राबवायची असेल तर सक्षम अधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक समिती नेमावी. यामुळे प्रभावीपणे योजना राबविण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पालिका शाळांमध्ये सुरू केलेली योजनाही फेल गेल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निर्दशनात आणून दिले.

चरई तलाव, बांद्रा तसेच 56 ठिकाणी योजना सुरू आहे. भांडूप येथील शिवाजी तलावामध्ये राबविणार आहोत. मात्र, सदस्यांनी मांडलेले मुद्दे हे गंभीर आहेत. याबाबत ज्या इमारतींनी रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबविली नाही. त्यांना सक्तीचे नोटीस देणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी स्पष्ट केले. तर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा मुद्दा दप्तरी दाखल केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages