पालिका विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वेळेवर मिळत नसल्याने विरोधकांचा सभात्याग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2015

पालिका विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वेळेवर मिळत नसल्याने विरोधकांचा सभात्याग

मुंबई (प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालोपयोगी २७ वस्तू वेळेवर मिळतनाहीत, या विरोधात पालिका विरोधीपक्षनेते देवंद्र आंबेरकर यांनी घोषणाबाजी करून सभात्याग केला. तसेच विरोधकांसह सत्तधारी भाजपाचे शिक्षण समिती आजी माजी अध्यक्षांनी तीव्र निषेध व्यक्त केला. तर 45 दिवसात विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात येतील, अशी ग्वाही प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.



मुंबई महापालिका शाळांचा दर्जा सुधारावा, याकरिता पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. या वस्तूचे वाटप करण्यास विलंब होतो. तर खांदेश्वरी नावाचा साखर विक्रेता पालिका विद्यार्थ्यांना बूटे पुरविण्याचे काम करतो. मात्र, त्यास कोणतीही वॉरंटी दिली जात नसल्याचा आरोप, कॉंग्रसेचे प्रविण छेडा यांनी केला. जोपर्यत विद्यार्थ्यांना वस्तू मिळत नाहीत तोपर्यत विभागात आंदोलन करणार असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादीचे पिसाळ यांनी यात काय अर्थकारण आहे, ते स्पष्ट करण्याची मागणी केली. तसेच दर्जेदार वस्तू देण्याची मागणी केली. माजी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी वस्तू पुरवठा करणाऱ्या कंपनी कोणताही प्रतिसाद देत नसल्याने विलंब होत असल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी केली. या मागणीचे सर्वसदस्यांनी समर्थन केले. यावेळी शाळांबाबतचा प्रत्येक प्रस्ताव हा सहा महिन्यापूर्वी आणण्याची सूचना केली. तर सत्तेत असून ही प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अकूंश नाही, हे दुर्दैव असल्याचे सपाचे गटनेते रईस शेख यांनी म्हटले.
दरम्यान, पालिका शाळेतील सर्व विद्यार्थी झोपडपट्टी भागातील आहेत. त्यामुळे त्यांना शालेय वस्तूंचे वाटप लवकर करावे, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी 45 दिवसात वस्तू देणार असल्याचे आयुक्त श्रीनिवास यांनी स्पष्ट केले. यामुळे हैराण झालेल्या विरोधकांनी निषेध व्यक्त करीत सभात्याग केला. 

Post Bottom Ad

JPN NEWS