झाड पडल्यामुळे अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2015

झाड पडल्यामुळे अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी

मुंबई (प्रतिनिधी)- मुसळधार पावसामुळे तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गोवंडी येथे झाड पडले. हे झाड हटविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या 2 जवांनावर शेजारील दुसरे झाड पडल्याने ते जखमी झाले.  त्यांना उपचार्थ पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सायन- ट्रोम्बे मार्गावरील व्ही. एन. पूरव मार्ग आज सांयकाळी सातच्या सुमारास झाड उन्मळून पडले. हे झाड हटविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले. झाड काढण्याचे काम सुरु असताना तेथील दुसरे झाड अचानक पडले. यात अग्निशमन दलाचे दशरथ जाधव आणि दत्तात्रय पवार हे दोन जवान जखमी झाले. त्यांना तात्काळ पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पालिकेने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS