मुंबई ( प्रतिनिधी ) - बेस्टच्या एका ग्राहकांने गेल्या बारा वर्षांपासून 19 लाख 65 हजार इतके वीजेचे बील थकविले आहे. हे थकबाकीचे प्रकरण इतकी वर्षे प्रशासनाने दाबून ठेवल्याचे तीव्र पडसात आज बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आज सदस्यांनी केली.
कुमारी देवी फुलचंद कनोजिया यांच्याकडून रामलाल गुप्ता याने वीज घेतली होती. वीजेच्या मीटरचे 7 लाख 11 हजार इतके बील थकले होते. ही थकबाकी 19 लाख 65 हजार इतकी झाली. मात्र गेल्या बारा वर्षात याबाबत बेस्टच्या अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही असा सवाल सदस्यांनी बैठकीत केला. 2011 साली हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी फक्त तीन महिन्याची थकबाकी आपण वसूल करू शकतो त्यापेक्षा जास्त कालावधीच्या थकबाकीची वसूली करता येत नाही असे एक मत यावेळी समितीत पुढे आले. या प्रकरणी कायदेशीर मत मागविण्याची मागणी सदस्यांनी केली. बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. बेस्टच्या फसवणूकीचे प्रकरण बेस्ट अधिकाऱ्यांच्या अंगलट आल्याचे आज दिसून आले.
300 थकबाकीदारांचे काय?कॉंग्रेसचे सदस्य शिवजी सिंह आणि रवी राजा यांनी दहा लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांची यादी सादर केली होती. त्या यादीवर कारवाई का केली नाही असा सवाल सिंह यांनी केला. या थकबाकीदारांचा चौकशी अहवाल सादर करण्याची मागणीही त्यांनी केली.