प्रगत परिसर व्यवस्थापन गटातर्फे शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी कचऱयाचे वर्गीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2015

प्रगत परिसर व्यवस्थापन गटातर्फे शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी कचऱयाचे वर्गीकरण


मुंबई / प्रतिनिधी - नागरी घन कचऱयाच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी कचऱयाचे वर्गीकरण करणे आवश्यक 
आहे. यामध्ये वस्तुंचा कमी वापर, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरणाद्वारे (Reduce, Reuse & Recycle) कचऱयाचे प्रमाण कमी करता येते. घरगुती स्तरावर कचऱयाचे ओला व सुका असे वर्गीकरण करण्यासाठी महापालिका मुंबईतील मोहल्लानिहाय स्थानिक नागरिकांचे ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ (प्र.प.व्य.) गट स्थापन करुन कचरा वर्गीकरणास गती देणार आहे. ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ गटांना कचरा वर्गीकरणात प्रोत्साहनासाठी महापालिकेने व्यवस्था केली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या स्थानिक पातळीवरील ओला व सुका कचरा वर्गीकरणाची मोहीम प्रबळ करण्याकरीता, मुंबई महापालिकेच्या सर्व विभागातील प्रत्येक ‘प्रगत परिसर 
व्यवस्थापन’ गटाने महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱया गाडय़ांच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आला आहे. 

महापालिकेच्या सर्व २४ विभागातील ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ गटांना कळविण्यात येते की, सुका कचरा गोळा करणाऱया वाहनांच्या मार्गांची यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विभागवार सर्व ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ गटांनी त्यांच्या सभासदांना त्या-त्या विभागातील सुका कचरा गोळा करणाऱया वाहनांचे दिवस, वेळ व मार्ग याची माहिती देण्यात येणार आहे. सुका कचरा गोळा करणाऱया वाहनांच्या मार्गांची यादी ही त्या-त्या विभागातील सहाय्यक अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) यांजकडून वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. प्रसिद्ध केलेल्या ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ गट नियमावलीनुसार, अकार्यक्षम ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ गटांनासुद्धा त्यांच्या ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ गटाची संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे नोंदणी झाल्यानंतर या सुविधांचा लाभ घेता येईल.
विभागवार ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ गटांच्या सविस्तर याद्यांची माहिती व सुका कचरा गोळा करणाऱया वाहनांचे मार्ग तसेच दिवस व वेळ या सुविधेबाबतची माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (http://portal.mcgm.gov.in) दिनांक १५ जून, २०१५ पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS