मुंबई : मुंबई पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शालोपयोगी वस्तू देण्याचा प्रस्ताव शाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी, विलंबाने आणल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. प्रस्ताव उशिरा आणून तो संमत झाल्याची प्रक्रियाही विलंबाने सुरू होणार असल्यामुळे या वस्तू शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कशा मिळणार, असा मुद्दा सदस्यांनी मांडला. मात्र हा सुमारे ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंगळवारी रात्री उशिरा सदस्यांच्या घरपोच होऊनही सर्वपक्षीय सदस्यांनी प्रस्तावाला झटपट संमती दिली.
विद्यार्थिनींना छत्री, रेनकोट आणि वह्या देण्याचा सुमारे ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आला. 'या वस्तू वेळेवर व चांगल्या दर्जाच्या मिळत नसल्याच्या तक्रारी गेल्या वेळी केल्यानंतर आयुक्तांनी जी चौकशी समिती नियुक्त केली होती, त्यांचा अहवाल अजून आला नाही, याकडे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी लक्ष वेधले आणि गेल्या वर्षी याच वस्तूंचे दर काय होते याची माहिती देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. या वस्तू विद्यार्थ्यांना कधीच वेळेवर मिळत नाहीत व त्यांचा दर्जाही चांगला नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधानांच्या जनाधार योजनेनुसार पैसे जमा करावेत, असेही ते म्हणाले. पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनीही शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या वस्तूंचा दर्जा योग्य नसल्याचे सांगितले आहे. यामुळे त्यांच्या मताचा विचार करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी केली. या प्रस्तावात विद्यार्थ्यांची दाखवलेली संख्या चुकीची आहे, असा संशयही छेडा यांनी व्यक्त केला.

शालेय विद्यार्थ्यांना छत्र्या आणि रेनकोट एक वर्ष आड मिळतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील अहिर म्हणाले. काँग्रेसच्या वकारुन्निसा अन्सारी यांनी समिती सभागृहात नव्या कोर्या दोन छत्र्या उघडून त्यांची प्रत्येकी किंमत २00 रुपये असताना प्रशासन मात्र जादा दराने या वस्तू खरेदी करत आहे, अशी टीका केली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनीही प्रशासन व कंत्राटदार यांच्यात मिलीभगत आहे, असा आरोप केला. या वस्तू 'मेड इन इंडिया की मेड ईन चायना' असतील, अशी खोचक विचारणा केली. या विषयाबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती, ती फेटाळून लावल्याचे तसेच या सर्व वस्तू 'आयएसआय' प्रमाणित व बाजारभावाने या वस्तूंचे दर निश्चित केले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी समितीला सांगितले.