माहिती आयुक्तांपर्यंत दाद मागूनही माहिती मिळालीच नाहीच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2015

माहिती आयुक्तांपर्यंत दाद मागूनही माहिती मिळालीच नाहीच

आयुक्तांचा अधिकाऱ्यावर कारवाईलाही नकार 
केईएममधील महिलेचे मृत्यू प्रकरणमुंबई : सामान्य नागरिकांना माहिती मिळावी म्हणून माहितीचा अधिकार कायदा बनवण्यात असला, कायदा बनवण्यात आला असला तरी त्याचा फायदा सामान्य जनतेला न होता खोटी माहिती देणाऱ्या आणि माहिती लपवणाऱ्या अधिकाऱ्यानाच होत नसल्याचे दिसून येत आहे. केईएम रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू प्रकरणात राज्य माहिती आयुक्तांपर्यंत माहिती अधिकारात दाद मागूनही माहिती न देणाऱ्या, माहिती लपवणाऱ्या कामचुकार अधिकार्‍यांना अभय मिळत असल्याचा प्रकार घडला आहे. 

लालबाग येथे राहणारे रमेश सोनोने यांची पत्नी ममता सोनोने यांचा २0 सप्टेंबर २0१२ रोजी केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टर व नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. अशा बेजबाबदार डॉक्टर आणि नर्सकडून इतर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, या हेतूने मयत ममता यांचे पती रमेश सोनोने यांनी त्या वेळी केईएमच्या डीन संध्या कामत यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी या अन्यायाविरोधात लढा देण्याचे ठरवले. पत्नीचा मृत्यू डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची तक्रार सोनोने यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. गुन्हा लपवण्यासाठी वॉर्डात सीसीटीव्ही असतानादेखील नाही म्हणून खोटी माहिती देणार्‍या केईएम प्रशासनाविरोधात सोनोने यांना आणखी एक पुरावा मिळाल्याने त्याच्या आधारे भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल करून त्याचा पाठपुरावा सहाय्यक संचालक व सहकारी अभियंता आदींकडे केला. अखेर पोलिसांनी या प्रकरणात दोषी असलेल्या डॉक्टर व नर्सविरोधात मात्र हा गुन्हा दाखल करूनही एक वर्ष उलटले तरीदेखील दोषींवर अटकेची कारवाई झालेली नाही.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सोनोने यांना माहितीच्या अधिकाराचा आधार घेतला. मात्र त्यांना माहितीच्या अधिकारातूनदेखील खोटी माहिती देण्यात आली. याविरोधात ते अपिलात जाऊन त्यांनी केईएम रुग्णालायचे डॉक्टर अमर पाझारे यांनी या प्रकरणाची माहिती देण्यास दुर्लक्ष केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत २0 एप्रिल २0१५ रोजी त्यांना स्वत: राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यासमोर उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. पाझारे यांनी गायकवाड यांच्यासमोर उपस्थिती लावून अपीलकर्ता यांना यापूर्वीच माहिती देण्यात आल्याचे सांगितले. मात्र अपीलकर्ता रमेश सोनोने यांच्या म्हणण्यानुसार, मला कोणाकडूनही बोलावणे आले नसून त्यांना कोणतीही कागदपत्रे तपासण्यासाठी दिलेली नाहीत. तरीदेखील मुख्य माहिती आयुक्तांनी डॉ. पाझारे यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अनेक दिवस माहितीच्या अधिकारामार्फत न्याय मिळवण्यासाठी झटणार्‍या रमेश सोनोने यांच्या पदरी निराशात आली आहे. अशा प्रकारे सामान्य माणसाला माहितीच्या अधिकाराच्या नावाखाली नाहक छळले जात असल्याचे समोर आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS