गावठी दारू प्रकरणांत मुंबईत २0 दिवसांत १४0 जणांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2015

गावठी दारू प्रकरणांत मुंबईत २0 दिवसांत १४0 जणांना अटक

मुंबई : गेल्या महिन्यात मालवणी येथे झालेल्या विषारी दारुकांडानंतर मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये १४0 जणांना अटक केली आहे. अटक आरोपींकडून ६५७ लिटर गावठी, तर १३७९ विदेशी दारूच्या १३७९ बाटल्या हस्तगत केल्या आहेत. 

मालवणी विषारी दारुकांडात १0४ लोकांचे बळी गेले असून हे आतापर्यंतचे विषारी दारुकांडापैकी सर्वात मोठे दारुकांड असल्याचे मृतांच्या आकडेवारीवरून उघड होत आहे. वसई, विरार, डहाणू हा समुद्रकिनार्‍याच्या पट्टय़ालगत गुजरातपर्यंत गावठी दारूचे साम्राज्य अधिक असल्याचे दिसून आले आहे. गावठी दारूवर बंदी असतानादेखील तिवरांच्या जंगलात खाड्यांलगत दारूच्या भट्टय़ा लावून गावठी दारू काढण्यात येत असल्याचे अनेकदा उघड झाले असून याला स्थानिक पोलीस, महानगरपालिका, उत्पादन शुल्क विभाग जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. कोणत्या ठिकाणी गावठी दारू बनवली जाते, ती कोठे विकली जाते, याची स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती असते मात्र, चिरीमिरीसाठी पोलीस या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करते आणि मालवणी दारुकांडासारख्या घटनांना सामोरे जावे लागते. आता या गंभीर प्रकरणानंतर मुंबई पोलीस जागे झाले असून सर्व परिमंडळातील पोलिसांनी दारूचे अवैध गुत्ते चालवणार्‍यांवर कारवाई केली आहे. त्याच्या आकडेवारीनुसार, दक्षिण परिक्षेत्रात एक, मध्य परिक्षेत्रात १२, पूर्व परिक्षेत्रात ३५, पश्‍चिम परिक्षेत्रात ३५ तसेच सर्वात अधिक १४0 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अटक आरोपींकडून एकूण १३७९ विदेशी दारूच्या बाटल्या आणि गावठी दारूच्या ६५७ लिटरच्या १९६ बाटल्या हस्तगत केल्या आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS