अग्निशमन दलातील जवानांच्या वेतनवाढीची फेरनिश्‍चिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2015

अग्निशमन दलातील जवानांच्या वेतनवाढीची फेरनिश्‍चिती

मुंबई : अग्निशमन दलाच्या ज्या जवानांची वेतन निश्‍चिती चुकली होती, त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीची फेरनिश्‍चिती करण्यात येणार आहे. शुक्रवारी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्याला आयुक्त अजॉय मेहता यांनी अनुकूलता दाखवली आहे.


महापौरांच्या दालनात अग्निशमन दलाच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव, नगरसेविका किशोरी पेडणेकर, मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील चिटणीस, कार्याध्यक्ष शरद कुवेसकर, रवींद्र घोसाळकर, सुनील महाडिक, राजाराम चुरी, मिलिंद वळंजू, नारायण केदार, अग्निशमन दलाचे प्रभारी प्रमुख प्रभार रहांगदळे, आयुक्त अजॉय मेहता आदी उपस्थित होते. गरजेनुसार जादा कामाची अट शिथील करणार, थकीत जादा कामाचा मोबदला मिळणार, रिस्क पे वाढवण्याबाबतचा पुनर्विचार करणार, ७२ दिवसांच्या आंदोलनाच्या खटल्याबाबत आपापसात समेट घडवून आणण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS