४00 अनधिकृत पोलीस चौक्या अधिकृत करण्याचा पालिकेकडे प्रस्ताव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

४00 अनधिकृत पोलीस चौक्या अधिकृत करण्याचा पालिकेकडे प्रस्ताव

Share This
मुंबई : मुंबई शहरात असलेल्या सुमारे ४00 अनधिकृत पोलीस चौक्या अधिकृत करण्याबाबतचा एक प्रस्ताव मुंबई पोलिसांकडून महापालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याचे कळते. जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील ९0 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी पाच ते सहा चौक्या विविध भागांत उभारण्यात आल्या आहेत; पण गेल्या दोन वर्षांत न्यायालयाने या चौक्या अनधिकृत असल्याने पाडून टाकण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. त्यानुसार काही पोलीस ठाणांच्या हद्दीतील चौक्या पालिकेने बुलडोझरने जमीनदोस्त केल्या. या मोक्याच्या जागांवरील चौक्या पाडल्या गेल्याने त्या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. चौक्या पाडण्यात आल्यामुळे काही ठाण्यांतील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली. लुटमार, सोनसाखळ्या चोरण्याचे तसेच दरोड्याच्या घटनांत वाढ झाल्यामुळे अशा भागातील नागरिकांनीच या चौक्या पुन्हा बांधण्याचा आग्रह वरिष्ठ अधिकार्‍यांकडे धरला.

नागरिक व सामाजिक संस्थांच्या आग्रहामुळे विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अगदी मोक्याच्या म्हणजे वर्दळीच्या जागी उभारण्यात आलेल्या अनधिकृत चौक्या अधिकृत कराव्यात. याबाबतचा एक प्रस्ताव गृहविभागाच्या सहमतीने पालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. या चौक्यांची संख्या चारशेहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यातील काही चौक्या सामाजिक संस्था तसेच शहरातील काही बड्या कंपन्यांनी स्वखर्चाने सुशोभित केल्या आहेत. अशा चौक्या अनधिकृत ठरवून पालिकेने त्या जमीनदोस्त केल्या. मुंबई शहर हे सतत दहशतवादी संघटनांच्या 'हिट लिस्ट'वर असल्याने या शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला पोलीस प्राधान्य देत असतात. शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्टेशन, मोक्याची बस आगारे अशा ठिकाणी 'सेफ्टी पॉइंट' म्हणून या चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यात सतत पोलिसांची वर्दळ असल्याने त्या भागातील गुन्हेगारांवर तसेच चोरी, लुटमार करणार्‍या टोळ्यांवर पोलिसांचा वचक असतो. त्यामुळे अनेक घटनांना आळा बसतो, म्हणून जनतेच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या या चौक्यांना अधिकृत करून त्या कायम राहतील, यासाठी आता त्या त्या भागातील नागरिक व सामांजिक संस्थाचे कार्यकर्ते पुढे आले आहेत. शहराच्या सुरक्षिततेसाठी या चौक्या अत्यंत मोलाचे काम करीत असल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages