मुंबई,(प्रतिनिधी): शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्यामार्फत उभारण्यात आलेय ' ओपेन जिम 'वादात सापडल्या असून या विरोधात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी उघडली आहे. आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन फुटपाथवर बसवण्यात आलेली सदर जिम काढून टाकण्याची मागणी कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केली तर फुटपाथवर अशाप्रकारे ओपेन जिम ला परवानगी देणे हेच बेकायदेशीर असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
मरीन ड्राइव्ह येथील फुटपाथवर ओपेन जिमला पालिका आयुक्तांनी दिल्याच्या पाश्वभूमीवर नितेश राणे आज आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी पदपथावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाइ करून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे केल्याबद्दल आयुक्तांचे आभार मानले . मात्र त्या अनुशंघाने मरीन ड्राइव्ह येथे बसवण्यात आलेल्या ओपेन जिमला परवानगी कशी दिली. असा सवालही त्यांनी केला या ओपेन जिमला कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती. तसेच पदपाथावर कोणतेही अतिक्रमण नसावे असे आदेश असताना हे फिटनेस सेंटर कसे बसविले, याला रीतसर परवानगी असेल तर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले असल्याच्या आरोप राणे यांनी केला. या ओपेन जीमवर दोन दिवसात पालिकेने करवाइ केली नाही तर हि जिम आम्ही उखडून टाकू असे आव्हान नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
शिवसेनेच्या युवराज आदित्य ठाकरे यांच्या बाल हट्टामुळे मुंबई महानगरपालिकेने चक्क फुटपाथवर जिम उभारण्याची परवानगी देण्याची नामुष्की पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यावर आली आहे. मुळात तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी परवानगी नाकारली असता सध्या चे आयुक्तांनी परवानगी कुठल्या कायद्याखाली दिली, असा सवाल करीत या विरोधात आपण कोर्टात दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सांगितले.