मध्य रेल्वे मार्गावरील १00 एटीव्हीएम हद्दपार होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य रेल्वे मार्गावरील १00 एटीव्हीएम हद्दपार होणार

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी वेळ लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (एटीव्हीएम) रेल्वे स्थानकात लावल्या असल्या तरी या मशिन्सची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येत नसल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील १00 मशिन्स बंद अवस्थेत आहेत. या १०० मशिन्स दुरुस्त होत नसल्यामुळे त्या लवकरच हद्दपार होणार असल्याची माहिती रेल्वे स्य्र्त्रनि दिली आहे.  

उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवर रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने सीव्हीएम कूपन्स आणि एटीव्हीएम मशिन्सचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्यापैकी सीव्हीएम कूपन्स रेल्वे प्रशासनाने १ एप्रिलपासून बंद केली आहेत. त्यामुळे एटीव्हीएम आणि तिकीट खिडक्यांवरच प्रवाशांना तिकीट काढावे लागते. त्यातच अनेक रेल्वे स्थानकांवरील एटीव्हीएम मशिन्स बंद असल्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

एटीव्हीएम मशिन्सची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे क ाम रेल्वे प्रशासनाने एका खाजागी कंपनीला दिले आहे. सीव्हीएम कुपन्स बंद झाल्यामुळे एटीव्हीएम मशिन्सवरून तिकीट काढणार्‍या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असली तरी अनेक स्थानकांवरील बंद एटीव्हीएममुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवरील १00 एटीव्हीएम मशिन्स ही वेळेवर देखभाल आणि दुरुस्त न केल्यामुळे वापरातून काढण्यात येणार आहेत. या १00 मशिन्स दुरुस्त होणार नसल्यामुळे रेल्वे बोर्डाकडे नवीन एटीव्हीएम मशिन्ससाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

मध्य रेल्वेच्या मेन लाईन, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावर एकूण ६५८ एटीव्हीएम मशिन्स लावण्यात आली आहेत. कुर्ला स्थानकात २४, मुलुंड २२, घाटकोपर २२, दादर १९, सीएसटी १७,भायखळा, सायन, विद्याविहार, कांजूरमार्ग, भांडुप, कलवा, मुंब्रा, दिवा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वडाळा रोड, मानखुर्द, वाशी, सानपाडा, नेरूळ आणि पनवेल स्थानकांवर प्रत्येकी १0 मशिन्स, तर ठाणे स्थानकात ३९, कल्याण स्थानकात ३३ आणि डोंबिवली स्थानकात २४ एटीव्हीएम मशिन्स आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages