डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मुम्बई सेंट्रलला देण्याच्या मागणीसाठी खासदार रामदास आठवलेंनी घेतली रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मुम्बई सेंट्रलला देण्याच्या मागणीसाठी खासदार रामदास आठवलेंनी घेतली रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची भेट

Share This
नवि दिल्ली दि29--महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मुम्बई सेन्ट्रल रेल्वे टर्मिनसला देण्यात यावे या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी रेल्वेमंत्री ना.सुरेश प्रभु यांची रेल भवन येथे भेट घेतली यावेळी ही मागणी स्वागतार्ह असून पंतप्रधानांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेवू असे आश्वासन रेल्वे मंत्री प्रभूंनि आठवलेंना दिले

रेल्वेच्या जमिनिवरील झोपड़्यांना संरक्षण द्यावे त्या झोपड्यांचा पुनर्विकास करुन पक्की घरे द्यावित तसेच मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांचे नुतनिकरण  करावे व रेल्वेस्थाकांवर शॉपिंग कॉम्पलेक्स बांधावेत यामध्ये आणि सर्व रेल्वे स्थाकांवर 25टक्के स्टॉल्स एससी एसटी बेरोजगार युवकासाठी राखीव ठेवावेतअशी मागणी खासदार अठवले यांनी केली. पंढरपुर मुम्बई एक्सप्रेस गाडी दररोज सुरु करा एसी लोकल लवकर सुरु करा प्लॅटफार्म ची ऊँची वाढवा एक्सप्रेस गाड्यांना जनरल च्या डब्यांची संख्या वाढवून 5 करावी तसेच प्रत्येक एक्सप्रेसला थ्री टायर चेही 5 डब्बे जोडवेत  यासह  मुंबईतील रेल्वे प्रवाश्यांच्या अनेक प्रश्नासाठी खासदार रामदास आठवले यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंशी चर्चा केली यावेळी रिपाइंचे राष्ट्रिय सचिव दयानंद मोहिते उपस्थित होते

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages