मुंबई : दरवर्षी ऐन पावसाळ्यात मुंबईकरांच्या मनात धडकी भरवणार्या मिठी नदीचे पात्र एप्रिल २0१७ पर्यंत स्वच्छ करून प्रकल्प पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
२६ जुलै २00५ मध्ये मिठी नदीने पात्र ओलांडून केलेल्या रौद्ररूप धारण केल्यानंतर मिठी नदी स्वच्छता आणि पात्राच्या बाजूला सुरक्षित भिंत उभारण्याचे काम एमएमआरडीए व मुंबई महानगरपालिकेला सोपविण्यात आले. आत्तापर्यंत मिठी नदीच्या विकासावर १0५७ कोटी रुपये खर्च झाले असून, संपूर्ण प्रकल्प एप्रिल २0१७ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. मिठी नदी प्रकल्प विकासाचा काही भाग पालिकेकडून तर काही भाग एमएमआरडीएकडून पूर्ण करण्यात येत आहे. पालिकेकडे विहार तलाव ते सीएसट पूल दरम्यान ११.८ किमी तर एमएमआरडीएकडे सीएसटी पूल ते माहीम कॉजवे असा ६ किमी तसेच वाकोला नाल्याचा भाग विकासासाठी देण्यात आला आहे.
प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी देण्याचे ठरले होते मात्र, अजूनही केंद्राकडून आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालिकेला २८.९७ कोटी रुपये तर दुसर्या टप्प्यात ५७३.८९ कोटी रुपये खर्च झाले असून, संपूर्ण प्रकल्पासाठी १२३९.६0 कोटी इतका आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दोनदा मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्ण झालेला नाही, तर एमएमआरडीएकडील पहिल्या टप्प्यासाठी ३४.५0 कोटी तर दुसर्या टप्प्यात ४१९.९२ कोटी खर्च झाले असून, एकूण खर्च ४६७..५१ कोटी इतका अपेक्षित आहे. एमएमआरडीएलासुद्धा ३ वेळा मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्ण झालेला नाही.