लाचखोर मनपा अभियंत्यासह दोघांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाचखोर मनपा अभियंत्यासह दोघांना अटक

Share This
मुंबई : चार दिवसांपूर्वीच बिल्डरकडून ५ लाखांची लाच स्वीकारताना पकडलेल्या महानगरपालिकेच्या दुय्यम अभियंत्यानंतर शनिवारी भांडुप येथे आणखी एका दुय्यम अभियंत्याला झोपडीधारकाकडून लाच घेतल्याप्रकरणी एका आरटीआय कार्यकर्त्यासह एसीबीने अटक केली आहे.

भांडुप येथे राहणार्‍या तक्रारदारांनी त्यांच्या राहत्या झोपड्याची दुरुस्ती केली होती. त्याविरोधात आरटीआय कार्यकर्ते रणजीत यादव यांनी मनपाच्या एस/वेस्ट वॉर्डमध्ये तक्रार दाखल केली. झोपडीवर तोडक कारवाई न करण्यासाठी येथील दुय्यम अभियंता योगेश सुरेश पंडित याने तक्रारदार झोपडीधारकाकडे २0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराने एवढी रक्कम देण्यास असर्मथता दाखवली. तरीदेखील पंडित व यादव यांनी त्यांना झोपडी तोडण्याबाबत धमकावून लाचेची मागणी केली. अशात तक्रारदाराने दोघांना १0 हजार रुपये देण्याची तयारी दाखवली व या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)कडे तक्रार दाखल केली. एसीबीने शनिवारी भांडुप येथे लावलेल्या सापळय़ात यादव १0 हजारांची लाच घेताना अडकला. तपासात दुय्यम अभियंता पंडित याचेदेखील नाव आल्याने त्याला अटक करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages