मुंबई : पाच वर्षांपूर्वी शिवसेनेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेला 'शिव वडापाव' मुंबई महापालिकेच्याही लेखी बेकायदाच आहे. 'शिव वडापाव'ला पालिकेची मान्यता नाही, असे विधान काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केल्यानंतर त्यावरून सुरू झालेल्या वादाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही 'साथ' मिळाली आहे.
'शिव वडापाव'च्या स्टॉल्सना महापालिकेच्या अनुज्ञापन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे कळवले आहे. यामुळे 'शिव वडापाव'च्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील नेते धनंजय पिसाळ यांनी दिला. राष्ट्रवादी न्यायालयात गेल्यानंतर या प्रकरणी राजकीय 'तडका' मिळणार आहे. 'शिव वडापाव'च्या बेकायदा स्टॉल्सवर पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने काँग्रेसने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच कांदे-पोहे स्टॉलची 'बोहनी' केली. यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. त्यात आता राष्ट्रवादीही उतरली आहे. 'शिव वडापाव'चे स्टॉल्स अधिकृत आहेत का, त्याला परवाना आणि आरोग्य विभागाची परवानगी आहे का, याची माहिती पिसाळ यांनी या दोन विभागांकडे मागवली असता, त्यांच्याकडून 'राष्ट्रवादी'ला अपेक्षित असलेले लेखी उत्तर मिळाले. यामुळे शिवसेनेला 'आयतेच' कोंडीत पकडण्याचे 'कोलीत' काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांना मिळाले आहे. पुढील आठवड्यात, २९ जुलै रोजी पालिकेची महासभा होणार आहे. त्या वेळी हा मुद्दा 'तापणार' अशी शक्यता आहे. 'शिव वडापाव' योजना सुरू करण्याची योजना शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी पालिकेच्या महासभेत संमत करून घेतली; पण त्याला अजूनही पालिकेच्या परवाना आणि आरोग्य विभागाने मंजुरी दिलेली नाही. तरीदेखील शिवसेना 'सत्तारुढ' असल्याचा फायदा घेऊन हे स्टॉल्स ठिकठिकाणी चालवत आहे.