मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिकिटांसाठी तिकीट खिडक्यांवरील गर्दीत वाढ होत आहे. वाढत्या गर्दीला तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएमचा मार्ग स्वीकारला आहे. तरीदेखील तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकात कॅश कॉईन ऑपरेट एटीव्हीएम मशीन्स बसवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. त्यानुसार नवीन ७0 कॅश कॉईन एटीव्हीएम मशीन्स येत्या महिनाभरात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे तिकिटासाठीची रांग कमी होईल, असा विश्वास रेल्वे अधिकार्यांना वाटतो आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतच आहे. या वाढत्या गर्दीला तिकीट मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम मशीन्स रेल्वे स्थानकात लावली आहेत. त्याचबरोबर कॅश कॉईन एटीव्हीएम मशीन्सदेखील सीएसटी आणि चर्चगेट स्थानकात बसवण्यात आली आहेत. या मशीन्समध्ये कॉईन आणि नोटा टाकून तिकीट काढता येते. लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणार्या प्रवाशांना या कॅश कॉईन एटीव्हीएम मशीन्सद्वारे तिकीट काढता येणे शक्य आहे. येत्या महिनाभरात ७0 नवीन कॅश कॉईन एटीव्हीएम मशीन्स लावण्यात येणार आहेत. त्यापैकी १0 मशीन्स उपनगरीय मार्गावर तर ६0 मशीन्स पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर लावण्यात येणार आहेत. या एका कॅश क ॉईन मशीन्सची किंमत ५ लाख ५0 हजार रुपये आहे. या कॅश कॉईन मशीन्समुळे प्रवाशांना आपल्या तिकिटाची जेवढी किंमत आहे तेवढी रक्कम त्यामध्ये टाकून तिकीट घेता येणार आहे

