पालिका शाळेतील सर्वच विद्यर्थ्याना सहलीचे नियोजन व सहलीकरिता पुरक निधी उपलब्ध करावे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळेतील सर्वच विद्यर्थ्याना सहलीचे नियोजन व सहलीकरिता पुरक निधी उपलब्ध करावे

Share This
मुंबई,सोमवार (प्रतिनिधी): मुंबई महापालिका शाळेतील सुमारे चार लाख विद्यार्थीपैकी  केवळ ५० हजार विद्यार्थीना  सहलीची संधी देण्यात येते. त्यामुळे सुमारे ३ लाख ५० हजार विद्यार्थी सहलीचा आनंद घेवू शकत नाही. कारण बहुतेक मुले ही  गरीब कुटुंबातील असल्याने  ते सहलीचा निस्सीम आनंदापासून वंचित रहातात. सदर बाब शिक्षण विभागासाठी गंभीर व संवेदनहीन असून  हे लक्षात  घेऊन शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी पालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले व सहली साठी पूरक निधी व सहलीचे तातडीने नियोजन करावे असे पत्रक पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages