मुंबई - अवैध्य दारू विक्रीची माहिती महिलांकडून मिळविण्यासाठी त्यांच्या स्वतंत्र टिम करण्यात आल्या आहेत या महिलांसह अन्य महिलांनीही अवैध दारू विक्रिची माहिती पोलिसांच्या 100 नंबरवर कळवल्यास या माहितीच्या आधारे स्वतंत्र अधिकारी नेमून कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
मालवणी येथील दारूकांडाबाबत लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून विधानसभेत आज चर्चा झाली या चर्चेत सहभागी होताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ही दारू दहिसर मार्गे मुंबईत आली महापालिकेच्या जकात नाक्यावर असणारे स्कॅनर बंद होते त्यामुळे ही दारू सहज मुंबईत आणण्यातता आली तसेच उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे तयार केली. अशी माहिती देत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी अवैध दारू बाबतची माहिती देण्यासाठी स्वतंत्र फोनलाईन सुरू करण्याची मागणी केली त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 100 नंबरवर अशी माहिती देण्यात यावी त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून कारवाई केली जाईल. अन्य माहितीबाबत चौकशी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

