मुंबई - गेल्या सहा वर्षात मुंबई महापालिकेने डीसी रूल 33(24) अंतर्गत वहानतळांसाठी दिलेल्या एफएसआयचे आणि प्रत्यक्ष तयार झालेले वाहानतळे आणि महापालिकेकडे हस्तांतरित झालेली वाहानतळे याचा स्टेटस रिपोर्ट सरकार तयार करेल काय असा प्रश्न आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला त्याला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सकारात्मक विचार करण्यात येईल असे सांगितले
मुंबई महानगरपालिकेने डिसी रूल 33(24) अंतर्गत शहरात 30 , पूर्व उपनगरात 10 व पश्चिम उपनगरात 19 अशा एकूण 60 बिल्डरांना जादा एफएसआय देऊन 42,664 वाहनतळांसाठी देण्यात आली होती. मागील 6 वर्षांत केवळ 1434 गाड्यांचीच पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली पालिकेची विकासकांकडून फसवणूक झाली आहे काय असा तरांकित प्रश्न आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना नगर विकार राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केवळ 1000 वाहनतळ उपलब्ध झाल्याचे मान्य केले. त्यामुळे यावर उपप्रश्न विचारून आमदार अॅड. आशिष शेलार यांनी गेल्या सहा वर्षांचा स्टेटस रिपोर्च सरकार तयार करणार काय अशी मागणी केली ज्या रिपोर्टमध्ये दिलेला एफएसआय आणि मिळालेली वाहनतळे याची सविस्तर माहिती देण्यात येईल त्यांची ही मागणी मंत्र्यांनी मान्य केली या चर्चेत आमदार मनिषा चौधरी, योगेश सागर आदी सहभागी झाले

