पालिकेच्या विविध विभागामध्ये चतूर्थश्रेणीची 13 हजार 532 रिक्त पदे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या विविध विभागामध्ये चतूर्थश्रेणीची 13 हजार 532 रिक्त पदे

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) -  पालिकेच्या विविध खात्यांमध्ये चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 13 हजार 532 इतकी पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे भरलेली नाहीत. त्यामुळे भरती कंत्राटीकरणातून न करता पालिकेच्या प्रतिक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत प्राधान्याने सामावून घ्या अशी मागणी पालिका आयक्त अजोय मेहता यांच्याकडे उमेदवारांच्या शिष्टमंडळाने केली. येत्या दहा दिवसात याबाबत तोडगा काढू, अशी ग्वाही आयुक्तांनी या शिष्टमंडळास दिली आहे.


सरळ सेवा भरती मधील मंजूर पदांतून रिक्त झालेली 9 हजार 694 पदे आहेत. तर पदोन्नतीमुळे रिक्त झालेली 4 हजार 181 पदे आहेत. ही पदे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाने भरण्यास टाळाटाळ केली आहे. ही पदे भरण्यासाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी आझाद मैदानात आंदोलन केले. त्यांनी पालिका आयुक्त मेहता यांची भेट घेतली. कंत्राटीकरणातून चतूर्थ श्रेणी कामगारांची भरती करू नये. पालिकेच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्या, पालिकेने नव्याने भरती प्रक्रिया सुरू करून पैसा वाया घालवू नये अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे उमेदवारांनी केली. पालिकेची रुग्णालय, शाळा तसेच पालिकेच्या विविध खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. असे असताना भरती बाबत पालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. येत्या दहा दिवसात याबाबत तोडगा काढू अशी ग्वाही पालिका आयुक्त मेहता यांनी दिली आहे. पालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या मागण्यांना
पाठींबा दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages