तानसा जलवाहिनी लगतच्या 1754 झोपड्यांवर कारवाईची लवकरच कुऱ्हाड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तानसा जलवाहिनी लगतच्या 1754 झोपड्यांवर कारवाईची लवकरच कुऱ्हाड

Share This
माहूलला स्थलांतरीत होण्यास स्थानिकांचा कडाडून विरोध
मुंबई ( प्रतिनिधी ) - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तानसा जलवाहिनी लगतच्या घाटकोपर आणि विद्याविहार येथील झोपड्यांवर कारवाई होण्याच्या भितीने येथील रहिवाशांचे धाबे दणाणले आहे. येथील रहिवाशांनी चेंबूर येथील माहूल भागात स्थलांतरीत होण्यास कडाडून विरोध दर्शविला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने जलवाहिन्या लगतच्या झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पालिकेने घाटकोपरमधील कातोडीपाडा ते वर्षानगर तसेच विद्याविहार या भागातील 1 हजार 754 झोपड्यांना कारवाई संदर्भात नोटीसा पाठविल्या आहेत. नोटीसा पाठविलेले रहिवाशी गेल्या चाळीस ते पन्नास  वर्षांपासून येथे रहात आहेत. येथून त्यांना चेंबूर येथील माहूलला स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मात्र येथून स्थलांतरीत झाल्यास त्यांच्या रोजी रोटीचा आणि मुलांचे शैक्षणिक प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यताअसल्याने रहिवाशांनी या स्थलांतरीत होण्यास विरोध केला आहे. बाधित कुटुंबाना माहूल या ठिकाणी ठिकाणी न पाठविता विद्याविहार येथील एचडीएलगतच्या भुखंडावर स्थलांतरीत करावे अशी मागणी स्थानिक नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे. त्यांनी या मागणीला सकारात्म प्रतिसाद दिला आहे.

तर उपोषणास बसणार 
जलवाहिन्या लगत राहणारा श्रमजिवी वर्ग आहे. त्यांना माहूल येथे स्थलांतराला विरोध आहे. त्यांना उपजिविकेचे साधन मिळावे यासाठी त्यांचे स्थलांतर विद्याविहार येथे करा अन्यथा उपोषणास बसणार असल्याचा  इशारा स्थानिक नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages