वेश्याव्यवसायातून ५ मुलींची सुटका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वेश्याव्यवसायातून ५ मुलींची सुटका

Share This
मुंबई : लॅमिंग्टन रोड येथील एका इमारतीत अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याच्या माहितीवरून समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून ५ मुलींची सुटका केली. या प्रकरणी कुंटणखाना चालक महिलेला ताब्यात घेण्यात आले.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पोलिसांना अशी माहिती मिळाली की, लेमिन्टन रोड, पाववाला स्ट्रीट, सिम्पेल्स बिल्डिंग, खोली नं. १0, तिसरा मजला या ठिकाणी मुन्नी नावाची महिला ग्राहकांना अल्पवयीन मुली पुरवून या ठिकाणी कुंटणखाना चालवत आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिडकर दातीर, शितोळे व पथकाने रात्री ९.५0 च्या दरम्यान या कुंटणखान्यावर छापा टाकून ५ बळीत अल्पवयीन मुलींची सुटका केली. या प्रकरणी कुंटणखाना चालक महिलेला ताब्यात घेऊन डी. बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा पुढील तपास डी.बी. मार्ग पोलीस करीत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages