मुंबईत 18 दिवसात विविध रुग्णालयात साथीचे 6305 रुग्ण दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2015

मुंबईत 18 दिवसात विविध रुग्णालयात साथीचे 6305 रुग्ण दाखल


ताप , गॅर-टो , आणि मलेरियाचा उच्छाद
मुंबई ( प्रतिनिधी ) - 
मुंबईत पावसाला सुरुवात होताच विविध साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणात डोकवर काढले आहे गेल्या 18 दिवसात तब्बल 6 हजार 305 रुग्ण पालिकेच्या आणि राज्य सरकारच्या विविध रुग्णालयात दाखल झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे .यामध्ये तापाचे सवाॅत जास्त रुग्ण असून संपूर्ण मुंबई तापाने फणफणली आहे तर गॅर-टो आणि मलेरियाने थैमान घातले आहे. या वाढलेल्या आजारामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे


मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यावर लागलीच विविध साथीचे आजार पसरतात त्यामुळे पालिका प्रशासन खबरदारी म्हणून विविध उपाययोजना राबवते पण पालिका प्रशासनाच्या सुविधाही लोकसंख्येसमोर तोकडया पडत असून रुग्णांच्या संखेत वाढत होत चालली आहे. परिणामी गेल्या 18 दिवसात 6 हजार 305 रुग्ण पालिकेच्या आणि राज्य सरकारच्या विविध रूग्णालयात दाखल झाले आहेत.  त्यात तापाचे 4411, मलेरिया 609 , लेप्टो 4 , डेंग्यू  38 , एचवन एनवन 19 , गॅर-टो  1023 , टायफाईड 102 आणि हेपेटीटीस  99 अशा रुग्णांचा समावेश असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य  विभागाकडून देण्यात आली आहे. प्रत्येक दिवसाला शेकडो रुग्ण दाखल होत आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साथीचे आजार जास्त वाढले आहेत पालिकेकडून दरवर्षी विविध उपाययोजना करूनही आजार आटोक्यात न येता वाढत आहे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करत आहे  मात्र आजार आटोक्यात येत नसल्याने कोट्यवधी रुपये फूकट जात आहेत त्यामुळे पालिकेच्या आरोग्य उपाययोजनां बाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. पावसानेही आता पाठ फिरवल्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. पावसाने सध्या विश्रांती घेत असल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे पालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी मजबूत उपाययोजना राबवायला हवी अन्यथा हे आजार मोठ्या प्रमाणात थैमान घालून मुंबईकरांचा बळी घेतल्या शिवाय राहणार नाही अशी भिती मुंबई कर व्यक्त करत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS