मारहाण करणाऱ्या पालिका उपयुक्तावर कारवाईची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2015

मारहाण करणाऱ्या पालिका उपयुक्तावर कारवाईची मागणी


मुंबई । प्रतिनिधी
मुंबई  महानगर पालिकेच्या आर मध्य विभागात कनिष्ठ अवेक्षक म्हणून काम करणाऱ्या विजय मानकर याना कामावर असताना पर्यवेक्षणासाठी आलेले उपायुक्त आर. बी. ढाकणे यांनी शिविगाळ करून मारहाण केली. या मारहाणीमधे मानकर यांच्या कानाचा पडदा फाटला आहे. या प्रकरणाची चौकशी करून मानकर याना नुकसान भरपाई द्यावी तसेच ढाकणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी हिन्दुस्तान मजदुर संघाने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. तर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने ढाकणे यांच्या विरोधात काळ्या फीती लाऊन काम करत चौकशीची मागणी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS