मुंबईत दिवसाला टीबीमुळे 21 जणांचा मृत्यू - प्रजाचा धक्कादायक अहवाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत दिवसाला टीबीमुळे 21 जणांचा मृत्यू - प्रजाचा धक्कादायक अहवाल

Share This
मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून दिवसाला किमान 21 जणांचा मृत्यू टीबीमुळे होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. सन 2014-15 मध्ये टीबीमुळे 6496 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर टीबीबरोबरच मलेरिया, डेंग्यू, टायफाईट, कॉलरा आणि मानसिक तणावाने कित्येक लोक त्रस्त आहेत. 2014-15 मध्ये मुंबईत 4938 केसेस टायफाईटच्या, 31 केसेसे कॉलराच्या आणि 38670 केसेसे मानसिक तणावाच्या दिसून आल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.


प्रजातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या मुंबईतील आरोग्य सुविधाच्या श्वेतपत्रिकेनुसार सार्वजनिक आरोग्य सुविधा विषयी सद्यस्थिती दर्शविण्यात आली आहे. पालिका अर्थसंकल्पात आरोग्यासाठी 3359.78 कोटीची तरतूद आहे.विशेष करून ई विभागात 2015 मध्ये मुंबईकर वार्षिक उत्पन्नाच्या 9.3 टक्के रक्कम खर्च करतो. या संर्दभात बोलताना निनाई मेहता यांनी सांगितले की, या वर्षात डेंग्यूच्या 10299 केसेस आढळल्या. सन 2014-15 मध्ये 37.6 टक्के व्यक्ती डेंग्यूने मृत झाल्या. तर 2014 मध्ये मलेरियांना 112 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे आजार बरे होणारे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होत असले तर कशावर खर्च होतो, असा सवाल मेहता यांनी विचारला आहे.

आरोग्य विषयक अधिक चांगली माहिती उपलब्ध होण्यासाठी मृत्यूविषयीची माहिती व्हर्बलअटॉप्सीसारख्या उपायामंधून जाणे गरजेचे आहे. त्याचबरोबर माहिती गोळा करण्यावरही अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सरकारला मायक्रोहेल्थ इन्शोरन्स, प्रायामरी हेल्थकेअर वाढवून सर्वाधिक तळातील लोकांपर्यंत पोहोचवून मुंबईतील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या गरिबांपर्यंत सुविधा पोहवचणे गरजेचे असल्याचे प्रजाच्या निताई मेहता यांनी सांगितले. 

नगरसेवकांमध्ये आरोग्यविषयक अनास्था
मुंबईत महानगरपालिकेत 227 नगरसेवकांपैकी 61 नगरसेवकांनी मार्च 2012 ते मार्च 2015 या तीन वर्षात आरोग्य विषयक एकही प्रश्न विचारलेला नाही. तर सार्वजनिक आरोग्य समितीतील दोन नगरसेवकांनी आरोग्य सेवा विषयक एकही प्रश्न विचारलेला नाही. यावरून लोकप्रतिनिधींबाबतही आरोग्य विषयक अनास्था दिसून येत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages