परेच्या ट्रयाकजवळील झोपडी धारकांचे त्वरित पुनर्वसन करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परेच्या ट्रयाकजवळील झोपडी धारकांचे त्वरित पुनर्वसन करा

Share This
परे झोपडपट्टी रहिवाशी संघाची मागणी 
मुंबई / प्रतिनिधी 
पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिस्टन ते दहिसर पर्यंतच्या १४५४ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे आदेश असतानाही अद्याप पुनर्वसन केले गेले नसल्याने या झोपडी धारकांचे त्वरित पुनर्वसन करावे अशी मागणी पश्चिम रेल्वे झोपडपट्टी रहिवाशी संघाचे सरचिटणीस नंदलाल यादव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना या झोपड्या ४० ते ४५ वर्षापासून आहेत. एमयुटीपी २ या प्रकल्पाअंतर्गत या झोपड्यांना हटवण्यासाठी सांगण्यात आले. त्या बदल्यात या झोपडीधारकांना माहूल येथे पीएपीची घरे देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परंतू या झोपडी धारकांचे पुनर्वसन हि धोरणात्मक बाब असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे असल्याने  २००८ पासून या झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. १४५४ झोपडी धारकांच्या पुनर्वसनाबाबत शासनाने योग्य असा निर्णय घेतला नसल्याने रेल्वे प्रशासन या झोपडी धारकांवर सातत्याने कारवाई करत आहे. या ठिकाणी पूल, पार्सल कार्यालय, पॉवर हाउस याचे बांधकाम सुरु असल्याने झोपड्या पडल्या जात आहेत. राज्य सरकार, केंद्र सरकार यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, तत्कालीन खासदार एकनाथ गायकवाड इत्यादी लोकप्रतिनिधीनी पत्रव्यवहार केला आहे. परंतू सरकार दुर्लक्ष करत पुनर्वसन करण्यात आलेले नाही असे यादव यांनी सांगितले. रेल्वे ट्रयाकजवळ राहणाऱ्या या रहिवाश्यांचा जीव धोक्यात असल्याने त्वरित पुनर्वसन करावे अशी मागणी यादव यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages