मुंबई । प्रतिनिधी
मुंबईमधे डेंग्यू मलेरिया लेप्टोपायरेसिस सारखे आजर पसरत आहे. लेप्टो पायरेसिस मुले अद्याप 16 लोकांचा मृत्यु झाला आहे. या आधीही मुंबईमधे मलेरिया आणि डेंग्यूमुले लोकांचा मृत्यु झाले आहेत. महानगर पालिकेने दहा कलमी कार्यक्रम राबवुन परिसर स्वच्छ राखण्यास सांगण्यात आले होते. यासाठी पालिकेने 2471 बांधकाम ठिकाणाना नोटिसा देवून सात दिवसात कारवाई करण्यास सांगितले होते. पालिकेने दिलेल्या नोटीसीनुसार बहुतेक बिल्डरानी आपले परिसर स्वच्छ करून घेतले. परंतू पालिकेच्या 10 कलामी कार्यक्रमाकडे 29 बिल्डरानी दुर्लक्ष केले. यामुले या 29 बिल्डरांचे काम बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत

