मुंबई : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. राज्यातील पत्रकारांसाठी नवृत्तीवेतन योजना, पत्रकार हल्लाविरोधी कायदा आदी मागण्यांसंदर्भात निश्चितच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे उद््घाटन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे या वेळी उपस्थित होते. पत्रकारांच्या नवृत्तीवेतनाचे आश्वासन भाजपाने निवडणुकीच्या जाहीरनाम्यातच दिल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा व्हावा, या मताचेच आम्ही आहोत. यासाठी निश्चितच सकारात्मक पावले उचलण्यात येतील. मंत्रालयातील पत्रकार कक्षातून याआधी दिग्गज पत्रकारांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. हा समृद्ध वारसा या पत्रकार कक्षातूनही पुढे जपला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.