मुंबईकरांकडून घेतलेला अतिरिक्त कर परत करण्याबाबत सकारात्मक विचार करू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकरांकडून घेतलेला अतिरिक्त कर परत करण्याबाबत सकारात्मक विचार करू

Share This

मुंबई - सन 2010 ते 2015 या कालावधीत मुंबईकरांकडून घेतलेला अतिरिक्त मालमत्ता कर मुंबईकरांना परत करण्यात यावा अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपा आमदारांनी विधानसभेत केली याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली.
 
मुंबई महापालिकेने 2010 ते 2015 पर्यंत मुबंईकरांकडून तब्बल  1200 कोटी रू. मालमत्ता करापोटी जादा आकारले. ही रक्कम मुंबईकरांना परत करणार का असा तारांकित प्रश्न भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला होता.  या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना आमदार अॅडआशिष शेलार यांनी महापालिका कायद्यानुसार कारपेट एरियानुसार मालमत्ता कर आकारणे बंधनकारक असताना बिल्डअप एरियानुसार कर आकारण्यात आला. त्यामुळे ही कर आकारणी कायद्याला धरून नाही, त्यामुळे ही रक्कम मुंबईकरांना परत करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याला उत्तर देताना रणजीत पाटील यांनी मुंबई महापालिकेने भांडवली मुल्यावर आधारित करप्रणालीचा अवलंब केला आहे. सदर नियमावलीमधून नियम क्र. 21 नुसार भांडवली मुल्य निश्चितीचे सूत्र देण्यात आले आहे. या सुत्रानुसार कर आकारणी करण्यात आली आहे. मात्र त्याला वेगवेगळ्या स्तरातून विरोध झाला असून  ही बाब सध्या न्यायप्रविष्ठ आहे मात्र अतिरिक्त मुल्य आकारले गेले असेल तर त्याचे परत करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल  असेही पाटील यांनी सांगितले या चर्चेत भाजपा आमदार योगेश सागर, अमीत साटम आदींसोबत घेतला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages